१३ जोडपी विवाह बंधनात

By Admin | Updated: April 25, 2016 00:29 IST2016-04-25T00:29:30+5:302016-04-25T00:29:30+5:30

संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ तुमसर तर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात आज १३ जोडपी विवाहबध्द झाली.

13 Couples get married | १३ जोडपी विवाह बंधनात

१३ जोडपी विवाह बंधनात

तुमसरात सामूहिक विवाह सोहळा : वऱ्हाड्यांची गर्दी
तुमसर : संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ तुमसर तर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळ्यात आज १३ जोडपी विवाहबध्द झाली. मागील १४ वर्षापासून संताजी बहुउद्देशिय सेवा मंडळ तुमसर तर्फे नि:शुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. या विवाह सोहळ्यात या वर्षी १३ वर-वधूंचे शुभमंगल लावण्यात आले. या मंगलप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, आमदार चरण वाघमारे, माजी आमदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, न.पा. सदस्या विजया चोपकर, सुरेश मलेवार, अ‍ॅड. दिलीप तिमांडे, प्रदीप पडोळे, किशोर भवसागर, कुंदा वैद्य, राजु भुरे, प्रभु मोहतुरे, विठ्ठल कहालकर यांची प्रमुख उपस्थितीत विवाह सोहळा संपन्नझाला.
याप्रसंगी प्रास्ताविक करतांना माजी आमदार व विवाह सोहळ्याचे आयोजक अनील बावनकर म्हणाले, वाढत्या महागाईच्या काळात सामुहिक विवाह सोहळ्यात आपल्या पाल्याचे लग्न लावणे म्हणजे कामाची व पैशाची बचत होते आणि त्यासाठी अश्या विवाह सोहळ्यात सहभागी होणे गरजेचे असून ज्यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला त्या सर्वाचे आपण अभिनंदन करतो असे गौरवौग्द्वागार अनिल बावनकर यांनी काढले.
कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद पडोळे, राजेंद्र वंजारी रामकृष्ण उखरे, प्रेमदास राऊत, सदाशिव मलेवार, दुधराम पोटभरे, बालूभाऊ पोटभरे, अनिल देशमुख, छगन येळणे, बालू भोंगाडे यांनी अथक प्रयत्न केले. संचालन अनिल कारेमोरे यांनी तर आभार रवंीद्र वंजारी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 13 Couples get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.