१,३९८ किलो आंबे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2016 00:27 IST2016-06-06T00:27:07+5:302016-06-06T00:27:07+5:30

कॉर्बाईडच्या सहायाने आंब्यांना कृत्रिमरीत्या पिकवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेले १,३९८ किलो आंबे नष्ट करण्यात आले.

1,3 9 8 kg of mangoes destroyed | १,३९८ किलो आंबे नष्ट

१,३९८ किलो आंबे नष्ट

भंडारा : कॉर्बाईडच्या सहायाने आंब्यांना कृत्रिमरीत्या पिकवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेले १,३९८ किलो आंबे नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनातर्फे शनिवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हे फ्रुट सेंटरमध्ये करण्यात आली.
कृत्रिमरित्या कॉबाईडव्दारे आंबे पिकवित असल्याची माहिती अन्न व औधषी प्रशासनाला ग्राहक मंचाच्या एका सदस्याकडून मिळाली होती. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी.नंदनवार यांनी संबंधित फ्रुट सेंटरमध्ये तपासणी केली. यात आंब्याचे नमुणे घेऊन तपासणी करण्यात आली.
यात १, ३९८ किलो आंबे कॉबाईडने पिकविल्याचे दिसुन आल्याने अन्न सुरक्षा मानद कायद्याचे कले ३८(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर आंबे वाहनाद्वारे भंडारा - वरठी मार्गावरील डम्पिंग यॉर्डमध्ये नेऊन अधिकाऱ्यांसमक्ष नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी केली. यावेळी पोयलवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 1,3 9 8 kg of mangoes destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.