१२ ग्रामपंचायतीत उपभोक्ता गट परिचय प्रशिक्षण

By Admin | Updated: June 26, 2014 23:05 IST2014-06-26T23:05:25+5:302014-06-26T23:05:25+5:30

वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे, प्रगती मागासवर्गीय महिला संस्था भंडारा तसेच प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मंडळ कृषी अधिकारी पहेला

12 Gram Panchayat Consumer Group Introduction Training | १२ ग्रामपंचायतीत उपभोक्ता गट परिचय प्रशिक्षण

१२ ग्रामपंचायतीत उपभोक्ता गट परिचय प्रशिक्षण

भंडारा : वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे, प्रगती मागासवर्गीय महिला संस्था भंडारा तसेच प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मंडळ कृषी अधिकारी पहेला यांच्या संयुक्त विद्यमान क्लस्टर क्रमांक १ भंडारा येथील १२ ग्रामपंचायतमध्ये उपभोक्ता गट परिचय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात मानेगाव बाजार, तिड्डी, बोरगाव बु., अर्जुनी, गराडा बु., बासोरा, गराडा खुर्द, दवडीपार बाजार, इटगाव, नवरगाव, जामगाव, वळद येथे यशस्विरित्या कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमात मंडळ कृषी अधिकारी सुरेश गणवीर यांनी लोकांनी एकत्र येवून पाणलोट समितीला सहकार्य करावे, पाणलोट योजनेचा फायदा घेवून शेतीचे उत्पन्न वाढवावे, कमी खर्चात शेती करूनच शेती व्यवसाय परवडणारा आहे. माजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबुराव वैद्य यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातंर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे, विकास कामे याबद्दल माहिती दिली. समुह संघटक सदस्य शैलेश हुमणे यांनी बचत गटाला मिळणाऱ्या बिनव्याजी फिरत्या निधीबाबत, गावस्तरावर शेतीवर व बिगर शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्यासंबंधी माहिती दिली. भुषण टेंभुर्णे यांनी पर्यावरणातील बदल, आजची परिस्थिती, वाढते प्रदूषण व वृक्षतोडीचे परिणाम, पाण्याचा अतिरेक उपसा यांचा येणाऱ्या दिवसात होणारे दुष्परिणाम, पाण्याचे चक्र व मृदावाहुन जाण्याचे दुष्परिणाम याचे प्रोजेक्टरवर चित्रफितीच्या माध्यमातून माहिती दिली. कार्यक्रमात ग्रामपंचायत पदाधिकारी, डीटीसी गणवीर, उपभोक्ता गट महिला व पुरूष शेतकरी यांनी उपस्थिती दर्शविली. बडोले, कृषीतज्ञ दहिवले, सर्व पाणलोट समिती सचिव श्याम ठवकर यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 12 Gram Panchayat Consumer Group Introduction Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.