शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तपासणीच्या तुलनेत १२ टक्के कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य होती. मार्च महिन्यात आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. एप्रिल महिन्यात १८६ व्यक्तींची तपासणी केली असता २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील महिला पाॅझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. मे महिन्यात १५१५ व्यक्तींची तपासणी केली असता ३० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले.

ठळक मुद्देसर्वाधिक सप्टेंबर महिन्यात

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात आतापर्यंत ९७ हजार ९९७ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात ११ हजार ७८१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत १२ टक्के व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले तर रुग्ण बरे होण्याचा दर ९२.६८ टक्के आहे.भंडारा जिल्ह्यात लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या अगदी नगण्य होती. मार्च महिन्यात आठ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात एकही व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. एप्रिल महिन्यात १८६ व्यक्तींची तपासणी केली असता २७ एप्रिल रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील महिला पाॅझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. मे महिन्यात १५१५ व्यक्तींची तपासणी केली असता ३० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. जून महिन्यात २८०० पैकी ५५ व्यक्ती पाॅझिटिव्ह, जुलै महिन्यात ३९८९ पैकी १६९, ऑगस्ट महिन्यात ८०३२ पैकी १०३३, सप्टेंबर महिन्यात २८ हजार ९३ पैकी ४ हजार १४९, ऑक्टोबर मध्ये २४ हजार ३८४ पैकी ३ हजार ८२, नोव्हेंबर महिन्यात १९ हजार ३५५ व्यक्तींपैकी २२५१ आणि १७ डिसेंबर पर्यंत ९६३५ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यात १०११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.जिल्ह्यात आटीपीसीआर अंतर्गत १९ हजार २८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात २८२४ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळले. ७८ हजार ४३३ व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी करण्यात आली असता त्यात ८ हजार ८३५ आणि टीआरयुएनएटी अंतर्गत २८४ व्यक्तींची चाचणी केली असता १२२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आलेत. जिल्ह्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 

गुरुवारी ६० पाॅझिटिव्ह ४२ कोरोनामुक्तभंडारा जिल्ह्यात गुरुवारी ६० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर ४२ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गुरुवारी ४९७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असता त्यात ६० व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यामध्ये भंडारा २६, तुमसर ११, मोहाडी ४, पवनी १, लाखनी १३, साकोली ५ रुग्णांचा समावेश आहे. लाखांदूर तालुक्यातील गुरुवारी एकही रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. भंडारा तालुक्यातील एका ५९ वर्षीय महिलेचा नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाने मृत्यू झाला. आता मृतांची संख्या २७८ झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस