११ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

By Admin | Updated: October 21, 2015 00:41 IST2015-10-21T00:41:14+5:302015-10-21T00:41:14+5:30

जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांचे रासायनिक खते विकताना अनियमितता बाळगली. ही बाब स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी ..

11 suspended fertilizer vendors licenses | ११ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

११ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

कृषी विभागाची कारवाई : दुकानदारांना अनियमितता भोवली
भंडारा : जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांचे रासायनिक खते विकताना अनियमितता बाळगली. ही बाब स्पष्ट झाल्याने जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयाने जिल्हयातील ११ कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित केले आहे. या कारवाईने कृषी केंद्र संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी कृषी केंद्राची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्या.
यात अनाधिकृत जागेत निविष्ठा साठा करुन साठेबाजी करणे, उगम प्रमाणपत्राची परवाण्यात नोंद न घेता परस्पर साठवणूक करणे, बिलबुक व साठापंजी अद्यावत न ठेवणे, डीएम यांची बेरीजेत तफावत आढळणे, विक्री अहवाल सादर न करणे, खतांकरिता एम.एफ.एम.एस. आयडी नसणे, नकली ब्रॉण्डची विक्री करणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे, मुदतबाह्य किटकनाशक व बियाणे साठा ठेवून त्यांची विक्री करणे आदी कारणांमध्ये कृषी केंद्र संचालक आढळून आले. यामुळे मोहाडी तालुक्यातील चार, साकोली तालुक्यातील चार तर तुमसर तालुक्यातील तीन अशा ११ कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. यात आठ कृषी केंद्राचे परवाने निलंबित तर तीन कृषी केंद्राचे परवाने कायमसाठी रद्द करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 11 suspended fertilizer vendors licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.