जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडूंब
By Admin | Updated: September 13, 2014 01:03 IST2014-09-13T01:03:29+5:302014-09-13T01:03:29+5:30
जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा सरासरी ६५ टक्के जलसाठा...

जिल्ह्यातील ११ प्रकल्प तुडूंब
भंडारा : जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा सरासरी ६५ टक्के जलसाठा असून ११ प्रकल्प तुडूंब भरले आहेत. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये गतवर्र्षीच्या तुलनेत यावर्षी स्थिती बरी नाही. मागील हंगामात सरासरीपेक्षा अधिक बरसलेला नाही.
लघुपाटबंधारे विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पांचा समावेश आहे़ सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची टक्केवारी ६९.६५, बघेडा ६६़३५, बेटेकर ३५.२४, सोरना जलाशयात २३.१४ टक्के जलसाठा आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात जलसाठयाची टक्केवारी ६४.३०इतकी आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ७४.२९ टक्के आहे़ ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखल पहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी.
पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा असला तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे. गतवर्षी दि़ १२ स्पटेंबर रोजी ६३ प्रकल्पात १२०.८७६ दशलक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता़ त्याची टक्केवारी ९९.२९ एवढी होती. (प्रतिनिधी)