११ लाख ३८ हजार पाठय़पुस्तकांचे होणार वितरण
By Admin | Updated: May 12, 2014 23:17 IST2014-05-12T23:17:20+5:302014-05-12T23:17:20+5:30
इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही मुल पाठय़पुस्तकापासून वंचित राहू नये आणि केवळ पाठय़पुस्तकाअभावी त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये,

११ लाख ३८ हजार पाठय़पुस्तकांचे होणार वितरण
भंडारा : इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणारे कोणतेही मुल पाठय़पुस्तकापासून वंचित राहू नये आणि केवळ पाठय़पुस्तकाअभावी त्यांच्या शिक्षणात अडचण येऊ नये, यासाठी सर्व शिक्षा अभियानांअतर्गत मोफत पाठय़पुस्तके योजना सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात ८ लाख २ हजार ७४ पाठय़पुस्तके तर ३ लाख ३५ हजार ९५८ स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप होणार आहे. इयत्ता १ ली ते ८ वीच्या शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, अनुदानीत अथवा अशंत: अनुदानीत खाजगी शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सदर पाठय़पुस्तके पुरविण्यात येणार आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात शाळा उघडण्यापूर्वी सात दिवस आधी ती पुस्तके देण्यात येतील. शाळेच्या पहिल्या दिवशी पदाधिकारी, सन्माननीय व्यक्ती यांच्या हस्ते पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यात येईल. (प्रतिनिधी)