१०० टक्के व्यसनमुक्त गाव ‘बोंडे’
By Admin | Updated: March 1, 2016 00:23 IST2016-03-01T00:23:07+5:302016-03-01T00:23:07+5:30
व्यसनमुक्त व आदर्श गावांचा पुरस्कार मिळालेल्या गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहेत.

१०० टक्के व्यसनमुक्त गाव ‘बोंडे’
गावात गुटखा व दारूचे दुकाने नाहीत : दर आठवड्याला मानवधर्माची नियमित बैठक
युवराज गोमासे करडी
व्यसनमुक्त व आदर्श गावांचा पुरस्कार मिळालेल्या गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहेत. व्यसनमुक्तीसाठी अनेक गावात आंदोलने होत आहेत. महिलांनी आवाज बुलंद केला आहे. मोहाडी तालुक्यातील आदिवासी ‘बोंडे’ गाव त्याला अपवाद ठरत असून सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरले आहे. बाबा जुमदेवजी यांच्या प्रेरणेने, स्वयंस्फुर्तीने १०० टक्के गाव व्यसनमुक्त झाले आहे.
मोहाडी तालुक्यातील खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत असलेले बोंडे हे छोटेशे आदिवासी गाव. गावाचा मुख्य व्यवसाय शेती व मजुरी आहे. लोकसंख्या २१८ कुटूंब संख्या ४८ आहे. गोंड, गोवारी, कलार, कुणबी आदी समाजाचे वास्तव्य आहे. कोका जंगल टेकड्याच्या पायथ्याशी गाव असताना संपूर्ण गावातील रस्ते व नाल्या सिमेंट काँक्रिटने बांधलेल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रंगमंच व हनुमंताचे मंदिर गावात आहेत. संपूर्ण गाव महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या मानवधर्मात सहभागी आहे.
दहा वर्षापुर्वी गावाची स्थिती वाईट होती. गावात पक्के रस्ते व नाल्याही नव्हत्या. पिण्याच्या पाण्यासाठी शेतशिवारात भटकावे लागेल. गावातील सर्वांना दारूचे जडले होते. कुटूंब व घरादारांची अवस्था दयनिय झाली होती. भांडणे तर पाचवीलाच पुजलेले असायचे. भूतबाधा, अंधश्रद्धा, जादूटोना, अंगात देवी-देवता येणे आदीमुळे गावाची सुख-शांती भंग पावली होती. दिवस रात्र कमावते व्यक्ती व्यसनात बुडालेले राहत असल्याने महिलांची कुचंबना व्हायची. लहान मुलांना शाळेतही पाठविले जात नव्हते. बाबा जुमदेवजी यांच्या मानवधर्मामुळे हे चित्र दहा वर्षानंतर पालटले. गावातील दुधराम मेश्राम हे या धर्माचे पहिले सेवक झाले. त्यांचे कार्य सुरूवातीला कुणालाही पटत नव्हते. मात्र एकएक कुटूंब मानवधर्माचा सेवक झाला. आध्यात्म प्रमुख प्रचारक लता बुरडे, यशवंत ढबाले यांच्या मार्गदर्शनामुळे दहा वर्षात संपूर्ण गाव १०० टक्के मानवधर्ममय होऊन व्यसनमुक्त झाले. गावात एकही दारूचे, गुटखा व खर्राची दुकाने बंद करण्यात आली. स्वयंस्फुर्तीने गावात दर आठवड्याला प्रत्येकाच्या घरी चर्चा बैठक होऊन एकमेकाचे दु:ख समजून सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने एकतेची ज्योत अखंड तेवत आहे.
या गावाला सन २००९-१० मध्ये स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाला. कोका वन्यजीव अभयारण्यामार्फत ग्राम परिस्थिती की विकास समितीचे अध्यक्ष रविकुमार मरस्कोल्हे यांच्या पुढाकारात गावातील प्रत्येक कुटूंबाला स्वयंपाकाचे गॅस व दुधाळ जनावरांचे वाटप नुकतेच करण्यात आले. प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे काम पुढील महिन्यापासून सुरू केले जाणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.