उमेदवारांच्या प्रचाराला मिळणार १० दिवस

By Admin | Updated: October 6, 2015 00:44 IST2015-10-06T00:44:45+5:302015-10-06T00:44:45+5:30

नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच संंबंधित क्षेत्रातील हवसे, गवसे अन नवसे कामाला लागले असून ...

10 days of campaigning for candidates | उमेदवारांच्या प्रचाराला मिळणार १० दिवस

उमेदवारांच्या प्रचाराला मिळणार १० दिवस

निवडणूक नगरपंचायतीची : अर्ज भरण्यासाठी अनेक दावेदार सरसावले
साकोली : नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच संंबंधित क्षेत्रातील हवसे, गवसे अन नवसे कामाला लागले असून उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा कालावधी मिळणार आहे. नगर पंचायतीमधील प्रभागाचे क्षेत्र पाहता वातावरण उत्साही दिसत आहे.
साकोली नगर पंचायतीची निवडणूक प्रक्रीया सुरू झाली आहे. १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. ९ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी करून त्याचदिवशी वैद्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख १९ आॅक्टोबर असून २० आॅक्टोबरला निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्हाचे वाटप केले जाईल. नगर पंचयतीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय सेंदुरवाफा येथे होईल.
नगर पंचायतीच्या निर्मितीबाबत मागील वर्षभरापासून शासनस्तरावर कार्यवाही सुरू होती. यावर्षीच्या सुरवातीला ही नगर पंचायत अस्तित्वात आली. तेव्हापासून इच्छुक उमेदवारांची अनेक दिवसापासून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आता प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने गावामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

उमेदवारीसाठी भाऊगर्दी
सध्या नामांकन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी आहेच. मात्र आपल्याच पक्षाची तिकिट मिळावी यासाठी पक्षाचे जेष्ठ नेत्याकडे उमेदवारांची सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअपचा उपयोगही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
बंडखोरीची शक्यता
नगर पंचायतीची निवडणूक ही पहिलीच निवडणूक असल्याने अनेकांना उत्साह आहे. प्रत्येकाला वाटते की तिकीट आपल्यालाच मिळावी यासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र तिकीट एकालाच मिळणार त्यामुळे बरेचजन बंडखोरीच्या तयारीत असून अपक्ष लढण्याच्याही तयारीत आहेत. माजी सरपंच खुशाल हुकरे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व राजकारणातून संन्यास घेतला होता. आता पुन्हा आपल्याच वॉर्डातून अपक्ष लढण्याची तयारी करीत आहेत.

Web Title: 10 days of campaigning for candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.