प्रगणनेत आढळला १ वाघ,११ बिबट

By Admin | Updated: May 13, 2017 00:17 IST2017-05-13T00:17:02+5:302017-05-13T00:17:02+5:30

भंडारा वनविभागात येणाऱ्या एकूण १० वनक्षेत्रातील वनांत एकूण ८७ पाणवठयांवर करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणेत....

1 tiger, 11 leopards found in cognition | प्रगणनेत आढळला १ वाघ,११ बिबट

प्रगणनेत आढळला १ वाघ,११ बिबट

८७ पाणवठयांवर वन्यप्राणी प्रगणना : ३,७५८ प्राण्यांचे वास्तव्य, २३ प्रकारचे प्राणी
भंडारा : भंडारा वनविभागात येणाऱ्या एकूण १० वनक्षेत्रातील वनांत एकूण ८७ पाणवठयांवर करण्यात आलेल्या वन्यप्राणी प्रगणेत एक वाघ व ११ बिबट आढळले असून २३ प्रकारच्या एकूण ३,७५८ वन्यप्राण्यांची नोंद या प्रगणनेत करण्यात आली.
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ही प्राणी प्रगणना करण्यात आली. यात वाघ-१, बिबट-११ चितळ ६८०, हरिण ६८, तडस-२, चौसिंगा-३, सांभर-१५३, निलगाय-२२९, रानडुक्कर-१०२४, अस्वल- ३४, रानकुत्रे-९६, रानगवे-५, भेडकी -३९, मोर -१६७, काळवीट - ५, ससे -२२, खोकड-२, लांडगा -३०, कोल्हा -१९, रानमांजर -६, माकड -११६१ आणि इतर १ अशी एकूण ३,७५८ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
भंडारा वन विभागातील भंडारा, अडयाळ, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर, तुमसर, जामकांद्री, लेंडेझरी व नाकाडोंगरी अशा एकूण ८७ पानवठयांवरील मचानावर एक वन विभागाचा कर्मचारी व एक स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी असे दोन व्यक्तींनी १० मे रोजी दुपारी १२ वाजतापासून दुसऱ्या दिवशी ११ मे दुपारी १२ वाजतापर्यंत पाणवठयावर येणाऱ्या वन्यप्राण्यांची प्रगणना केली. उन्हाळयात वन्यप्राणी २४ तासातून एकदा पाणी पिण्याकरीता येतात. पाणवठयावर बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद विहित प्रपत्रात करण्यात येते. यात तृणभक्षी व मांसभक्षी अशा दोन्ही प्रकारच्या वन्यप्राण्यांची प्रजातीवर प्रगणना करण्यात आली. तुमसर, नाकाडोंगरी, जामकांद्री व लेंडेझरी वनपरिक्षेत्रातील काही भागात दोन दोवसापूर्वी पाऊस आल्याने व बावणथडी प्रकल्पातून नहरात पाणी सोडल्यामुळे वन्यप्राण्यांच्या दृश्यतेस कमतरता जाणवली. सदर प्रगणेत सहभागी झालेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना भंडारा वन विभागाद्वारे प्रशस्तीपत्र देण्यात आले.
उपरोक्त वन्यप्राणी प्रगणना उप वनसंरक्षक उमेश वर्मा, सहाय्यक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी पी.जी. कोडापे, सहाय्यक वनसंरक्षक मनोहर गोखले, यांचे मार्गदर्शनाखाली मानद वन्यजीव रक्षक राकमल जोब, शाहिद खान यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली.

Web Title: 1 tiger, 11 leopards found in cognition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.