शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

झेन कथा - अपेक्षाभंगाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 2:45 AM

Zen story : तुमच्या जीवनामध्ये एक वेगळाच अर्थ शोधायचा असेल तर एका वेगळ्या मार्गावरून तुम्हाला चालावं लागेल. त्या मार्गाबद्दल मला सांगायचंय 

- धनंजय जोशी 

ग्रॅज्युएशन समारंभाला एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला आमंत्रण देऊन तिचं मुख्य भाषण ठेवण्याची अमेरिकेत प्रथा आहे.  नव्या पदवीधरांना या भाषणातून सल्ला मिळतो, काही विनोदी आठवणी सांगितल्या जातात, एकंदरीत जरा करमणूकपण होते.  झेन गुरुंना अशा भाषणांसाठी बोलावल्याची उदाहरणे जरा कमीच.  स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झेन रोशी  नॉर्मन फिशर यांनी २०१४ साली भाषण दिले होते. सरळ सत्य सांगितले तर ते झेन गुरु कसले? त्या भाषणातले काही भाग सांगण्यासारखे आहेत. कदाचित दोन किंवा तीन कथा लागतील सांगायला पण आपण बघूया ! ते म्हणाले,  ‘मला इथे बोलावले हा माझा सन्मान; पण खरे म्हणजे मी नशीबवान आहे. कारण तुमच्या आयुष्यातल्या ह्या महत्त्वाच्या क्षणी मला तुमच्याबरोबर चिंतन करायची संधी मिळाली आहे. तर आपण ह्या क्षणाकडे लक्ष्य देऊया. कॉलेजचे वातावरण मला अगदी स्वर्गात गेल्यासारखे वाटते. अभ्यासाचे वातावरण, वेगवेगळ्या सुंदर इमारती, समोर येण्याऱ्या जीवनाबद्दलची उत्सुकता आणि आशा.. हे सगळे वाटते छान; पण सत्य सांगू?.. पुढे जे काही येणार आहे, ते सोपे नाही. तुम्ही हुशार आहात, तरुण आहात, तुम्हाला कदाचित यश मिळेल, कदाचित मिळणारही नाही. कदाचित खूप मोठे यश मिळेल; पण काहीतरी राहून गेले आहे असे तुम्हाला वाटत राहील. तुम्ही गोंधळून जाल. तुमचे वैयक्तिक जीवनही जसे हवे तसे मिळेलच असे नाही.  मोठे होत जाल, तसतशी आजची आशा आणि उत्साह जपणे कठीण होत जाईल. तुमची आणि अपेक्षाभंगाची भेट होत जाईल, पण तेव्हा तुम्ही नोकरी-व्यवसायात बुडालेले असाल आणि अपेक्षाभंगाकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न कराल - पण तो प्रयत्नच की ! आत्तापर्यंत जे तुम्ही शिकलात त्याच्यापेक्षा एक वेगळीच शिकवण तुम्हाला शिकायला लागेल. तुमच्या  जीवनामध्ये एक वेगळाच अर्थ शोधायचा असेल तर एका वेगळ्या मार्गावरून तुम्हाला चालावं लागेल. त्या मार्गाबद्दल मला सांगायचंय 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक