शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

बाहेच्या जेवणात मिळत नाही, ती तृप्तता घरच्या जेवणात का मिळते माहितीय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:42 IST

फास्ट फूडच्या जमान्यातही घरचा डाळ भात खाल्ल्यानंतर 'अन्न हे पूर्णब्रह्म' का जाणवतं, चला जाणून घेऊ. 

रोजच्या जेवणाचा कंटाळा म्हणून चवबदल म्हणत आपण हॉटेलिंग करतो. बाहेर गेलो की फास्ट फूड, जंक फूड खातो. मित्रांबरोबर पिझ्झा, पास्ता, सॅन्डविचच्या पार्टी करतो. तोवर घरच्या अन्नाची किंमत कळत नाही. पण जेव्हा मेसचे जेवण, परदेशी गेल्यावर रोजचे हॉटेलचे जेवण, खाणावळीतला डबा खाण्याची वेळ येते किंवा आठ दहा दिवस घराबाहेर असल्यावर बाहेरच्या जेवणावर गुजराण करावी लागते, तेव्हा घरच्या अन्नाची किंमत कळते!

घरचे आणि बाहेरचे जेवण यात फरक काय? दोन्ही कडे पोटभरीचे अन्न मिळते. परंतु बाहेरच्या जेवणाने रसना तृप्ती अर्थात जिभेचे चोचले पुरवले जाऊ शकतात, मात्र घरच्या जेवणाने मनाला तृप्ती येते. बाहेरच्या जेवणाने तात्कालिक समाधान वाटत असले, तरी पुढच्या दोन तासात पुन्हा भूक लागते. सोडा किंवा बटाटा,चीज, अतिरिक्त साखर यांचा वारेमाप समावेश केल्यामुळे ते अन्न पोटभरीचे ठरू शकत नाही. याउलट घरी नाश्त्यात एक पोळी/चपाती खाल्ली तरी दुपारपर्यंत भूक लागत नाही. एवढा का बरं फरक पडत असेल?

तर फरक आहे, बनवणाऱ्या हातांचा! घरचा स्वयपांक करणारी गृहिणी घरच्यांच्या प्रेमापोटी तो स्वयंपाक करत असते. तो करताना तिचा उमाळा, आपुलकी, प्रेम त्या स्वयंपाकात उतरते. त्यामुळे तो स्वयंपाक पौष्टिक आणि रुचकर होतो. हॉटेलमधला स्वयंपाकी काम उरकत असतो. त्या पदार्थाच्या चवीशी, त्याच्याशी निगडित स्वच्छता, आरोग्य याच्याशी त्याचा संबंध नसतो. गृहिणी मात्र प्रत्येक गोष्ट निवडून घेतला. प्रेत्यक जिन्नस डोळ्याखालून घालतात. घरच्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन स्वयंपाक करतात. त्यामुळे तो स्वयंपाक सगळ्यांच्या पसंतीस उतरतो आणि अंगी लागतो. 

जेवण करणाऱ्याबरोबर वाढपी देखील महत्त्वाचा असतो. आता बुफे पद्धत आली. पूर्वी पंगती असत. पंगतीतले वाढपी आठवून बघा, झरझर वाढून पुढे निघून जात असत. त्या वाढण्यात आपुलकी नसल्यामुळे वाढणार्याचे भाव अन्नात उतरतात. लोक रुक्षपणे वाढतात, जेवणारे रुक्षपणे जेवतात. घरी आई, आजी, ताई, बायको, आत्या, मावशी, आग्रह करून जेवायला वाढतात. तो आपुलकीचा भाव नसेल तर घरच्या स्वयंपाकात आणि मेसवरच्या जेवणात काय फरक उरणार? 

आपला शरीर यज्ञ चालत राहावे, यासाठी अन्नाची आहुती देहात टाकली जाते. 'उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म' अशी ओळ 'वदनी कवळ घेता' या श्लोकात दिल आहे त्याच्या अर्थाला जागून थोडंच, पण रुचकर अशा घरच्या जेवणाचा आस्वाद घेऊया आणि पुढच्या पिढीलाही घरच्या जेवणाचे महत्त्व पटवून देऊया! शिवाय, अन्न घरचे असो नाहीतर बाहेरचे ते वाया जाणार नाही, फेकून द्यावे लागणार नाही, त्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेऊया!

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स