शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Women's Day 2025: महिला पुरुषांपेक्षा सरस कशा? सांगताहेत आचार्य चाणाक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 07:05 IST

Women's Day 2025: आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्त महिलांनी पुरुषांशी बरोबरी करण्यात वेळ न घालवता त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कशा ते जाणून घेतले पाहिजे!

आचार्य चाणक्य हे महान विद्वान, अर्थतज्ञ, मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात जीवनातील व्यावहारिक पैलूंबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये स्त्रिया आणि पुरुषांचे चारित्र्य, गुण आणि अवगुण याबद्दलही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार महिलांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामध्ये त्या पुरुषांपेक्षा खूप पुढे असतात. या बाबतीत पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाहीत. यामुळेच महिला या बाबतीत पुरुषांपेक्षा वरचढ ठरतात.

धाडस: चाणक्य नीतीनुसार पुरुषांसमोर स्त्रियांची प्रतिमा दुर्बल व्यक्तीची असली तरी वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की संकट काळात न डगमगता पुरुषांपेक्षा मनाने स्त्रिया जास्त स्थिर असतात. पुरुष पटकन खचून जातात, स्त्रिया निर्भयपणे प्रसंगाला सामोऱ्या जातात, आव्हान स्वीकारतात आणि जबाबदाऱ्या पार पडतात. म्हणून सजीव निर्मितीचे दान समस्त चराचरातल्या स्त्रीत्त्वाला नियतीने प्रदान केले आहे. 

बुद्धी: स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक हुशार असतात. त्या प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने विचार करून निर्णय घेतात. निर्णय प्रक्रियेत त्यांच्या सिक्स्थ सेन्सची सुद्धा त्यांना मदत होते. याउलट पुरुष रागाच्या भरात अनेकवेळा चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते. तर महिला या बाबतीत संयमाने आणि हुशारीने काम करतात. वाढत्या वयानुसार त्यांची निर्णय क्षमताही वाढत जाते. 

वात्सल्य : नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये वात्सल्य भाव असतोच. पुरुषांच्या तुलनेत त्या पटकन भावुक होतात आणि समोरच्याला क्षमा करतात. मात्र हा गुण स्त्रियांची दुर्बलता मानण्याची चूक करू नये. कारण त्या गौरीसारखे शीतल रूप धारण करत असल्या तरी क्षणात चंडिका होण्याचे सामर्थ्यही बाळगतात. म्हणून त्यांना गृहीत धरू नये. 

टॅग्स :Womens Day 2025महिला दिन २०२५Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी