शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
3
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
4
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
5
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
7
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
8
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
9
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
10
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
11
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
12
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
13
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
14
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
15
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
16
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
17
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
18
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
19
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
20
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:52 IST

सिंदूर ही केवळ सौभाग्याची खूण नाही तर त्यामागे दडला आहे मोठा गर्भितार्थ; ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सविस्तर माहिती जाणून घ्या!

६ जुलै २०२५ रोजी सर्व भारतीय सुखेनैव झोपलेले असताना भारतीय जवानांनी 'ऑपरेशन सिंदूर' (Opration Sindoor) यशस्वी करून पाकिस्तानची झोप उडवली आहे. अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या निष्पाप भारतीयांच्या मृत्युचा बदला या ऑपरेशनमधून घेतला गेला. इथे हे युद्ध थांबणार नसून 'पिक्चर तो अभी बाकी है' असे म्हणत लष्कर प्रमुखांनी पुढील कारवाईचे सुतोवाच करून ठेवले आहे. यात 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव अतिशय समर्पक ठेवले आहे. कारण पहलगाम येथील हल्ल्यात भारतीय कुटुंबातील कुटुंब प्रमुखांना अर्थात कर्त्या पुरुषाला मारून स्त्रीयांचे सिंदूर अर्थात सौभाग्य उजाडण्याचे धाडस दहशतवाद्यांनी केले. या 'सिंदूर'चे महत्त्व त्यांनाच माहिती, ज्यांनी आपले प्रियजन गमावले! आपणही सिंदूरचा मान ठेवूया आणि भारतीय संस्कृतीत ते का महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊया!

पूजा, विधी आणि मंगल संस्कारात कुंकवाबरोबर हळद असते. हळद आणि कुंकू ही सौभाग्यद्रव्ये समजली जातात. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवासाठी फार जपतात, कारण ते त्यांचे सौभाग्यलेणे असते. 

कपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्येतर स्त्रियांकडून अवलंबली आहे. कुंकवाचा रंग लाल आहे. अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. आर्येतर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते. मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवते रक्तवर्ण प्रिय असणारी आहेत.

इ.स. च्या तिसऱ्या व चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचे दिसून येते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे. पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावत असत. 

कुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख आहे. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जातो. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचे मानले असल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचे असते, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचे व त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत होती. विद्यमान काळातही अनेक आदिवासी जमातीत या प्रथेचे अवशेष आढळतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींनी देवीच्या मंदिरात कुंकवाचा सडा घालण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे. 

कुंकू अशाप्रकारे सौभाग्यप्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू झाला. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाल़े लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदु स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. विवाहप्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत़  `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो' अशी उदात्त, महन्मंगल भावना त्यामागे असते. लग्नप्रसंगी वधू वरांना कुंकू लावण्याची चाल पारशी लोकांतही आहे. मांगलिक कार्यात पुरूषांनाही कुंकू लावले जाते. 

कुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेषत: कोकण, महाबळेश्वर, आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात. कुंकवाची झाडे १२-१५ फुटापर्यंत वाढतात. साल जाड असते. पाने सदापर्णी लंबवर्तुळाकार असून पानाच्या शिरा तांबड्या असतात. फुलाचा रंग पिवळसर असून त्यांना देठ नसतात. फळे छोटी असून फळात छोटी बी असून त्यावर जी तांबडी भुकटी असते, तेच खरे कुंकू . हे कुंकू फार मौल्यवान असते. कृत्रिम कुंकू चुना व हळद यांच्या मिश्रणापासून बनवतात. तसेच हळद व हिंगुळ किंवा करडईपासून कुंकू बनवतात.

कुंकूमतिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुद्धिपूजेचे अधिष्ठान आहे. ईशपूजनानंतर तात्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करायचे. प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि नंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन होय. तिलक आस्तिकांचेही चिन्ह आहे.

आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि चिरंतन आहे. ते लावण्याच्या पद्धतीत कालानुसार स्थित्यंतरे होत गेली. अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध व आता आधुनिक काळात स्त्रिया टिकल्या वापरतात. पण यात मांगल्याचे व सौभाग्याचे ओज आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेज चिरंतन असून हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे.

समाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू ही मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणांतही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदीकुंकू करावयाची प्रथा आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन, आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे. विधवा माता भगिनींना अबीराचा टिळा, काळी टिकली लावण्याचा पर्याय दिला आहे. सौभाग्य अर्थात संसारी आयुष्य संपले तरी विरहात, नैराश्यात न जगता भगवंताची साथ आपल्याला आहे, याची जाणीव अबीराचा टिळा करून देतो. कुंकू सौभाग्याचे तर अबीर अध्यात्माचे प्रतीक आहे, म्हणून वारकरी संप्रदायात ते बुक्का तसेच गोपीचंदनाचा टिळा या बरोबर लावले जाते. आपली भाग्यललाट रिकामी ठेवू नये हा त्यामागचा सद्हेतू! देवीचा मळवट भरतो, खंडोबाचा भंडारा कपाळी लावतो, तेही आशीर्वाद म्हणून! एवढेच काय तर उदबत्तीची रक्षा, भस्म यांचा सुद्धा गंध म्हणून वापर केला जातो आणि तो विविध प्रकारे कपाळावर भूषवला जातो!

आज पाश्चात्य लोक भारतात येऊन सन्मानाने कुंकू लावून घेतात, मग आपण त्यांचे अनुसरण करून कुंकवाचा त्याग करायचा की कुंकवाचे महत्त्व जाणून घेत त्याचा लाभ घ्यायचा, याचा विचार करताना आपण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवायला हवी! कारण 'सिंदूर' चे महत्त्व त्यांनाच माहिती, ज्यांनी ते गमावले आहे....निदान आपण त्याचे महत्त्व जाणून घेऊया!

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला