शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

गर्भसंस्कार कशासाठी करायचे, कधी अन कसे?... जाणून घ्या महत्त्व!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 12, 2021 19:13 IST

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्या ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

आपण सगळेच जण या सृष्टीचा एक भाग आहोत. परंतु, सृष्टीतून सृष्टीनिर्माता होण्याची संधी नियतीने स्त्रिजातीला बहाल केली आहे. गर्भावस्था हे सृष्टीचे, परमात्म्याचे वरदान आहे. एका जीवाला जन्म देणे आणि घडवणे, हे मोठे पुण्याचे काम आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्यांची जडण घडण करायची आहेच, परंतु हिंदू शास्त्राने द्रष्टेपणाने विचार करून गर्भावस्थेपासून बाळावर संस्कार घालण्याचा आग्रह धरला आहे. कारण बाळाची जडण घडण जन्माला आल्यानंतर नाही, तर गर्भावस्थेपासून सुरू झालेली असते. या विधानाला विज्ञानानेदेखील पुष्टी दिलेली आहे.

सद्यस्थितीतील तरुणांना पाहता, संस्कारांचे पतन होताना दिसते. वयात आल्यानंतर मुलांना वळण लावणे कठीण जाते, कारण ते काहीही ऐकण्याच्या, समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. म्हणून ओल्या मातीला वळण दिले पाहिजे. ही ओली माती गर्भात असल्याच्या स्थितीपासून तयार होते. मनुष्याच्या मूळ स्वभावाला संस्काराचे वळण नियंत्रित करू शकते. 

आपण पाहतो, काही मुले अतिशय शांत असतात, तर काही मस्तीखोर, तर काही आक्रस्ताळी असतात. हा केवळ स्वभावाचा भाग नसून संस्कारांचाही भाग असतो. मुले आपल्या अवतीभोवती जे पाहतात, त्याचे अनुकरण करतात. वाईट गोष्टी पटकन शिकतात. गर्भात असल्यापासून मातेच्या माध्यमातून त्यांच्यावर बाह्य परिस्थितीचाही परिणाम होत असतो. म्हणून गर्भवती स्त्रियांना सतत आनंदी ठेवण्याचा कुटुंबाचा प्रयत्न असतो. मातासुद्धा आपल्या शिशुसाठी सर्व वेदना सहन करून चांगल्या गोष्टी अर्भकापर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत असते.

गर्भसंस्काराचे महत्त्व पुराणकाळापासून असल्याचे आपल्याला ऐकिवात आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिमन्यू. चक्रव्यूह भेदण्याचे प्रशिक्षण त्याला गर्भातच मिळाले होते. 

गर्भसंस्कारासाठी विशेष काही कष्ट घ्यावे लागतात का?तर नाही. मात्र, गर्भ संस्कार विज्ञान नीट समजून घेतले पाहिजे. अलीकडे गर्भ संस्काराच्या नावावर उथळ माहिती देणारे क्लासेस लोकांकडून पैसे उकळतात. परंतु, गर्भ संस्कार विज्ञानामागे वेदांचा मोठा अभ्यास आहे. अनेक तज्ज्ञ वर्षानुवर्षे त्याचा अभ्यास आणि संशोधन करत आहेत. मन, बुद्धी, संस्कार यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या मंत्रांचा त्यात समावेश असतो. शांत चित्ताने ते मंत्र केवळ ऐकायचे असतात. गर्भ संस्कारात ८० टक्के भाग हा केवळ ऐकण्यावर अवलंबून असतो. त्या संस्कारांचा बाळांवर सकारात्मक परिणाम होतो. भविष्यात त्यांची प्रगतीही दिसून येते. यासाठी योग्य गर्भसंस्कार वर्गांची निवड केली पाहिजे. केवळ नावावर, भूलथापांवर विश्वास ठेवून पैशांचा आणि वेळेचा व्यय न करता याबाबत ज्येष्ठांकडून अधिक माहिती घ्यावी व गर्भधारणेची बातमी कळल्यापासून गर्भ संस्कार सुरू करावेत.

गर्भवती होणे हे स्त्रिसाठी वरदान आहे, तर आई होऊन बाळावर संस्कार करणे हे बाळासाठी आणि समाजासाठी मोठे वरदान आहे. प्रत्येक आईसाठी आपले बाळ ही भविष्यातील मोठी गुंतवणूक आहे. उद्या कोणी तुमच्या सोबत असो न असो, बाळ तुमची साथ कधीच सोडणार नाही. त्याला कारणीभूत, जगाआधी ९ महिने जास्त केलेले गर्भसंस्कार असणार आहेत.