शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेतल्या 'त्या' एका चिमणीचे अनेक आवाज लोकांना का ऐकू येत होते? आचार्य डॉ. लोकेश मुनी यांनी सांगितले कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 14:21 IST

सर्वधर्म समभाव मांडताना डॉ. लोकेश मुनी यांनी एका वाक्यात महत्त्व सांगितले, 'इंसान पहले इंसान, फिर हिंदू या मुसलमान!'

'जशी दृष्टी तशी सृष्टी' असे आपण म्हणतो, परंतु अनेकदा आपल्याला जे दिसते, तेच सत्य मानू लागतो. मात्र एकच गोष्ट प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळी दिसू शकते, हे आपण विसरतो.  यासाठीच कोण चूक आणि कोण बरोबर हे अनुमान न काढता प्रत्येकाचे आचार विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला विविधतेत एकता जाणवेल! हाच आध्यात्माचा गाभा आहे. 

हे समजून घेण्यासाठीच 'लोकमत'ने २४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन केले होते. `धार्मिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका या विषयावर या परिषदेत विविध धर्माच्या आचार्यांनी विचार मांडले. या विषयाचे मर्म उलगडून सांगताना डॉ. लोकेश मुनी यांनी हिंदीत एक छान मार्मिक गोष्ट सांगितली. 

एका गावात एक यात्रा असते. गावातली मंडळी यात्रेत सहभागी झालेली असतात. तिथे एका व्यक्तीला झाडावर बसलेल्या चिमणीचा अखंड चिवचिवाट ऐकू येतो. तो म्हणतो, 'आजचा दिवस शुभ आहे, असे वाटते. कारण चिमणी अविरतपणे 'राम लक्ष्मण दशरथ' म्हणतेय. हे मत व्यक्त करणारा हिंदू असतो. 

काही वेळाने तिथे मौलवी येतात, ते म्हणतात शुभशकून आहे, चिमणी 'सुभान तेरी कुदरत' म्हणतेय.

नंतर तिथे किराणा व्यापारी येतो. तोही चिमणीचा चिवचिवाट ऐकून थांबतो. चिमणी 'अदरक मिरची डगरक' म्हणतेय, म्हणजे व्यापार चांगला होणार दिसतेय.

तेवढ्यात भाजीवाला येता़े त्याला 'गाजर मुली अदरक' ऐकू येते. तोही खूष होऊन जातो.

तिथे एक पेहलवान मिशांना पीळ देत येतो, तो 'दंड मुगदर कसरत' असे ऐकतो आणि चिमणीचे आरोग्य ज्ञान बघून आनंदून जातो.

तात्पर्य, चिमणीचा चिवचिवाट नेहमीचा होता, परंतु ऐकणाऱ्याला तो त्याच्या विचारांनुसार ऐकू येत होता आणि तो आपल्या मतानुसार अर्थ घेत होता. 'जया जैसा भाव, तया तैसा अनुभव' असे संत म्हणतात, अगदी तीच प्रचिती या गोष्टीतून घडते. हे आपण सर्वांनी समजून घेतले, तर जगातून नकारात्मकता, द्वेष, मत्सर निघून जाईल. सर्वजण एकमेकांना समजून घेऊ शकतील. एकमेकांच्या मतांचा आदर करतील आणि जग सुंदर व सुसह्य बनू शकेल. असे सर्व सांगून समारोप करताना डॉ. लोकेश मुनी म्हणाले, 

आओ मिलकर बैठे बात करे, चार कदमही सही मिलकर साथ चले,यू तो दुरी से दुरी बढती जाएगी,कभी खुद से खुद मुलाकात करे।

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी