शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

जिथे आनंद असतो तिथे प्रेम असते आणि जिथे प्रेम असते तिथे परमात्मा असतो - ओशो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 3:57 PM

तुमच्या मनात या जगाबद्दल प्रेम भरून ओसंडावं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही नाचाल तर त्याला बघू शकाल. नृत्यात तो अत्यंत जवळ असतो. तुम्ही गुणगुत गा, म्हणजे तो सुद्धा तुमच्यासोबत गुणगुणेल. 

कमळ आणि चिखल यांच्यात काही संबंध दिसत नाही. पण संबंध आहे. चिखल माती ही जन्मदात्री आहे. ते गर्भाशय आहे. त्यात कमळाचा गर्भ धरतो. आणि मग जन्म होतो. ही पृथ्वी भलेही मृण्मय असेल, पण विसरू नका, यातून कमळ उमलण्याची शक्यता आहे. अनेक लोक चिखल म्हणत या पृथ्वीची निंदा करतात आणि ते निंदा करण्यात एवढे मग्न होतात, की त्यांना याच निंदेतून आशा अपेक्षांचे कमळ उमलताना दिसतच नाही. 

मी तुम्हाला कमळाची आठवण करून देत आहे. चिखलाची निंदा करण्याच्या भानगडीत न पडता कमळांचा शोध घ्या. ज्या दिवशी तुम्हाला चिखलात कमळ आढळतील त्या दिवशी या चिखल मातीचे आभार मानायला विसराल का? त्या दिवशी परमात्मा वसत असलेल्या या देहाला धन्यवाद देणार नाही का? त्या दिवशी या पार्थिव जगाबद्दल तुमचं हृदय अनुग्रहाने भरून जाणार नाही का? या पार्थिव जगात परमात्म्याचा अनुभव येतो त्या पार्थिव जगाची निंदा करू शकाल का?

तुमच्या मनात या जगाबद्दल प्रेम भरून ओसंडावं अशी माझी इच्छा आहे. या प्रपंचाचा निषेध करणाऱ्या जुन्यापुराण्या धारणांचे संस्कार समूळ उपटून टाकावेत असे मला वाटते. त्यांना पार पुसून टाका. परमात्म्याला बघण्यापासून, जाणण्यापासून ते तुम्हाला अडवत आहेत. दूर ठेवत आहेत. तुम्ही नाचाल तर त्याला बघू शकाल. नृत्यात तो अत्यंत जवळ असतो. तुम्ही गुणगुत गा, म्हणजे तो सुद्धा तुमच्यासोबत गुणगुणेल. 

मी गीत शिकवतो. संगीत शिकवतो. माझा हेतू एकच आहे. आनंद, उत्सव, महोत्सव! उत्सव महोत्सवाचे सिद्धांत बनवता येत नाहीत. ही केवल जीवनचर्या होऊ शकते. तुमचं जीवनच ते सांगू शकेल. केवळ ओठांनी बोलाल तर ते पोकळ होईल. खोटं वाटेल. आतून प्राणातून बोला. श्वासानी सांगा. आनंद उत्सव महोत्सव रोमारोमात भरू द्या.

जिथे आनंद असतो तिथे प्रेम असते. आणि जिथे प्रेम असते तिथे परमात्मा असतो. मी प्रेमाचे मंदिर बनवतो आहे. तुम्ही सुदैवी आहात की त्या मंदिराच्या उभारणीसाठी तुमचेही हात सहाय्यभूत होत आहेत. तुम्ही त्या मंदिरासाठी विटा निवडता आहात. तुम्ही या मंदिराची द्वारे बनवत आहात.

या पृथ्वीवरील आनंदाच्या मंदिराने फार पूर्वी इथला निरोप घेतला आहे. कधी कृष्णाने बासरी वाजवली तेव्हा ते अस्तित्त्वात असेल. मग कुणास ठाऊक कोणत्या तरी दुर्दैवी घडीला, कुणास ठाऊक कोणत्या निराशेच्या भरात, कोणत्या तरी नपुंसक लोकांच्या हाती आम्ही आपले जीवन सोपावले. पोकळ पंडितांच्या हाती आमचे जीवन घडले. त्यांनी आमचा गळा दोरीच्या फासात आवळला. मोठाली शास्त्रं गळ्यात अडकवली. चालणे मुश्किल झाले. नाचणे दूर राहिले. मोठाले सिद्धांत त्यांनी आमच्या गळी उतरवले. त्यामुळे गळा अवरुद्ध झाला. अशा स्थितीत गीत कसे गाणार?

शास्त्र, सिद्धांत, संप्रदाय मी तुमच्याकडून हिसकावून दूर भिरकावणार आहे. तुमची ओझी मला उतरवून ठेवायची आहेत. तुम्हाला मुक्त करायचे आहे. इतके हलके करायच आहे की तुम्ही पंख पसरून मनमोकळेपणी आकाशात उडू शकाल. मुक्तीचा आनंद लुटू शकला. हे आकाश तुमचे आहे. स्वच्छंद झेप घ्या आणि त्यात मनसोक्त विहार करा.