कान टोचण्याच्या प्रथेमागील शास्त्रीय कारण काय? अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सेशी त्याचा संबंध आहे का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:39 PM2021-10-21T12:39:04+5:302021-10-21T12:41:23+5:30

हिंदू धर्मशास्त्रात कर्णवेध हा महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. कानाचा संबंध शब्दग्रहणाशी असून शब्द हा आकाशगुण आहे. आकाशाची व्याप्ती अगण्य आहे. कानात शब्दगुणाने वास करणारे आकाश अमर्याद असल्यामुळे ही प्रचंड शक्ती काही वेळा अनर्थही घडवून आणू शकते. 

What is the scientific reason behind the practice of ear piercing? Is it related to acupuncture? Find out! | कान टोचण्याच्या प्रथेमागील शास्त्रीय कारण काय? अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सेशी त्याचा संबंध आहे का? जाणून घ्या!

कान टोचण्याच्या प्रथेमागील शास्त्रीय कारण काय? अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सेशी त्याचा संबंध आहे का? जाणून घ्या!

googlenewsNext

हिंदू धर्मात तान्ह्या बाळाचे कान टोचले जातात. त्यावेळेस काही बाळं कळवळून रडतात. त्यांना पाहून ही प्रथा काही जणांना अघोरी देखील वाटते. परंतु कान टोचण्यासाठी तेच वय का निवडले असावे? कान टोचल्यामुळे काय साध्य होते, कान टोचण्याच्या विधीचा आरोग्याशी काय संबंध आहे ते सविस्तर जाणून घेऊया. 

कान टोचलेली व्यक्ती 'विंध' म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात बहुसंख्य व्यक्तींचे कान टोचलेले असतात म्हणून त्यांना 'विंध' म्हणण्याची प्रथा आहे. याउलट कान टोचण्याची प्रथा नसलेल्या धर्मातील व्यक्ती 'अविंध' म्हणून ओळखल्या जातात. 

हिंदू धर्मशास्त्रात कर्णवेध हा महत्त्वपूर्ण संस्कार मानला जातो. कानाचा संबंध शब्दग्रहणाशी असून शब्द हा आकाशगुण आहे. आकाशाची व्याप्ती अगण्य आहे. कानात शब्दगुणाने वास करणारे आकाश अमर्याद असल्यामुळे ही प्रचंड शक्ती काही वेळा अनर्थही घडवून आणू शकते. 

चांदीची पोकळ मूर्ती तयार करताना ओतारी लोक त्या मूर्तीच्या बुडाशी छोटे छिद्र मुद्दाम करून ठेवतात. याचे कारण म्हणजे तसे छिद्र नसेल तर उष्णतेचा संपर्क घडताच ती मूर्ती स्फोट होऊन छिन्नभिन्न होते. 

हुबेहुब त्याप्रमाणे कानाला छिद्र असेल तर डोक्यात साठून राहिलेल्या कामक्रोधांचे स्फोट होत नाहीत. कान न टोचलेल्या व्यक्ती जितक्या रागीट, कामुक व द्वेष्ट्या असू शकतात तितक्या कान टोचलेल्या व्यक्ती तसे टोक गाठू शकत नाहीत. कारण अतिरिक्त भावनांचे उन्नयन होताच शब्दांच्या सहाय्याने लगेच त्यांचा निचरा होतो. 

कान टोचण्यामागे दुसरी वैज्ञानिक भूमिका म्हणजे कानाच्या पाळीमागे उपजतच असलेल्या सुक्ष्म खोलगट भागात दमा, खोकला, क्षय या रोगांशी संबंधित असलेल्या नसा असतात. चीनी शास्त्राप्रमाणे देहात प्रत्येक अवयवातील सूक्ष्म भागाता एखाद्या रोगाचे मूळ असते. तो भाग पंक्चर करताच तो रोग नाहीस होतो. चिनी 'अ‍ॅक्युपंक्चर' शास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्यामुळे ते लोकप्रिय झाले. पण खरी गंमत अशी, की या शास्त्राचा अभ्यास हिंदू धर्मशास्त्राने करून ठेवलेला असून कर्णवेध हा संस्कार त्याची साक्ष पटवून देतो. आहे ना अभिमानास्पद आपली संस्कृती...!

Web Title: What is the scientific reason behind the practice of ear piercing? Is it related to acupuncture? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.