शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

माउलींनी लावलेला मोगरा, आपल्याही आयुष्यात बहरला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:00 PM

बागेतल्या उमललेल्या कळ्या एवढ्या आनंद देतात, तर आयुष्यात मोगरा फुलेल, तो किती आनंद देईल याची कल्पना करा. 

आपण बहरात आल्याची वर्दी फुलांना द्यावी लागत नाही, त्यांचा परिमळ त्यांच्या अस्तित्वाची ओळख करून देतो. तीच बाब मोगरीच्या कळ्यांची. वाऱ्याच्या झुळुकेसरशी येणारा मोगऱ्याचा दरवळ मनाचा गाभारा व्यापून टाकतो. आपल्या बागेतल्या रोपट्याला मोगरीच्या कळ्या आल्या आणि बहरल्या, तरी आपल्याला किती हायसे वाटते! संत सांगतात, बागेतल्या कळ्या एवढ्या आनंद देतात, तर आयुष्यात मोगरा फुलेल, तो किती आनंद देईल याची कल्पना करा. 

हेही वाचा : जगद्गुरु शंकराचार्यांनी वाटसरूकडून शिकून घेतली, अद्वैताची व्याख्या!

भक्ताच्या परमार्थ जीवनात साधकदशेपासून सिद्धावस्थेपर्यंत जी वाटचाल होते, तिचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या एका अभंगात सुंदर रुपकाच्या माध्यमातून सूचित केले आहे. भक्ताला आत्मज्ञान होते. 'अहं ब्रह्म अस्मि' मीच परब्रह्म आहे. परमेश्वराचा अंश माझ्या ठिकाणी आहे. हा आत्मानुव व्यक्त करताना ज्ञानदेव म्हणतात,

इवलेसे रोप लावियले द्वारी,तयाचा वेलु गेला गगनवरी।मोगरा फुलला, मोगरा फुलला।फुले वेचिता अतिभारू कळियांसी आला।मनाचिये गुंती गुंफियला शेला,बाप रखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला।

आपल्या अंगणात अंकुरलेल्या इवल्याशा रोपाचा केवढा वाढविस्तार झाला, हे सांगताना ज्ञानदेव सांगतात, `माझ्या दाराजवळ मी आत्मविद्येचे लहानसे रोप लावले. त्या रोपाचा वेल बघता बघता बहरला. वेल आकाशभर पसरला. हा वेल मोगऱ्याचा होता. तो पानोपानी पुâलला. त्याच्यावर भावार्थाची असंख्य फुलं उमलली. पहिली फुलं वेचावीत, तोवर पुन्हा अनेक कळ्यांचा बहर येतच होता. त्या भाव-फुलांचा सुगंध हार मी गुंफला. रखुमाईचा पती व माझा पिता श्रीविठ्ठल यांच्या गळ्यामध्ये तो हार मी समर्पण केला.'

कविता म्हणजे भावनाशील मनाचा उचंबळून आलेला उद्गार हे या अभंगाला लागू पडते. ज्ञानदेवांची ही रचना म्हणजे पारमार्थिक भावकविता आहे. आत्मसाक्षात्काराची दिव्य अनुभूती एका प्रकट भावगीताचं रूप घेऊन या ठिकाणी व्यक्त झाली आहे. हे काव्य म्हणजे भाषेतील संगीत आहे.ज्ञानदेवांच्या या अभंगातील निखळ सौंदर्य केवळ अपूर्व आहे. मोगरीच्या फुलांचा रंग पांढराशुभ्र आहे. त्या फुलांचा गंध सौम्य, मधुर आहे. मोगरीचा वेल हिरव्या पानांनी बहरलेला आहे. त्या वेलीने आकाश व्यापून टाकले आहे. असंख्य कळ्या हळूहळू उमलत आहेत. कळ्यांची पुâले होत आहेत. या सर्वांचा मिळून येणारा एकात्म अनुभव या कळ्यांसारखा उमलत गेला आहे. 

पानोपानी बहरलेला मोगरा आणि भक्तीने भरून आलेले भक्ताचे अंत:करण या दोहोंतील एकरूपता आपल्या हृदयाचा ठाव घेतो. इवल्याशा रोपाप्रमाणे हा अभंग इवलासा आहे. हे इवलेपण नाजूक आणि सुंदर आहे. अभंग अल्पाक्षर असूनही आशयबहुल आहे. त्यया अखेरीची बाप रखुमादेवीवरू ही मुद्रिका ज्ञानदेवांची नाममुद्रा आहे. अभंगभर भराऱ्या घेणारी ज्ञानदेवांची प्रिती या नाममुद्रेपाशी येऊन थांबली आहे. 

समाजात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी समाजकार्याचे इवलेसे रोप लावले. त्याची मशागत केली. खतपाणी घातले आणि पाहता पाहता त्याचा वेल गगनापर्यंत जाऊन पोहोचला. असा मोगरा कोणा एकाला नाही, तर सर्वांना दीर्घकाळ आनंद देतो. असाच मोगरा आपल्याही कार्यातून बहरत राहावा आणि तो विठ्ठलचरणी अर्पण करत राहावा, हीच या अभंगाची फलश्रुती!

हेही वाचा :धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद नष्ट करणारे गोरक्षनाथ यांची जन्मकथा!