शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेगावला जाता आले नाही म्हणून काय झाले? बसल्या जागी 'अशी' करा गजानन महाराजांची मानसपूजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 07:05 IST

आज गजानन महाराजांचा प्रगटदिन, त्यानिमित्त शेगाव येथे जाऊन उपासना करता आली नाही म्हणून नाराज न होता, दिलेली मानसपुजा करा.

आपण पूजा करतो, ती देवासाठी नाही, तर आपल्या मन: शांतीसाठी. परंतु, आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाचिये द्वारी उभे राहायला दोन क्षणही सवड मिळत नाही. अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता, शास्त्राने दिलेला मानसपूजेचा पर्याय निवडावा. यासाठी देवपूजेसाठी करतो, तसाच विधी करावा. मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा. आपल्या हृदयमंदिरात देवाला बसवावे. भक्ती भावाची फुले वाहावीत आणि श्रद्धेचा धूप दीप लावून प्रार्थना करावी. एवढी सोपी आहे मानसपूजा. आज गुरुवार २० फेब्रुवारी  आणि गजानन महाराजांचा प्रगट दिन त्यानिमित्ताने गजानन महाराजांची मानसपूजा करूया. 

गुरु गजानन सांगे, नाही सक्तीची मूर्तिपूजा,भाव मनी ठेवून, करा मानसपूजा ।।

गुरु गजानन सांगे, नाही गेलात मंदिरी,तरी हात जोडा मनोमनी, भक्ती असू द्या अंतरी।।

गुरु गजानन सांगे, नको पूजन अर्चन,करा माझे स्मरण, करण्या मला आवाहन ।।

गुरु गजानन सांगे, नको पेटवू तो दीप,सोडा अहंपणा येथ, जाळा मी पणाचा धूप ।।

गुरु गजानन सांगे, नको ती तेलवात,मोह वासनेची वात, टाळा ओवाळून प्रपंचात ।।

गुरु गजानन सांगे, नसू दे दुर्वा हिरव्या,नामजपाच्या जुड्या, तुम्ही मला वहाव्या।।

गुरु गजानन सांगे, नको मोदक एकवीस,करा त्यास अन्नाने तृप्त, जो भुकेने असेल कासावीस।।

गुरु गजानन सांगे, नको पिठले भाकरी,धावा त्यांच्यासाठी, ज्यांना मदत आहे जरुरी।।

असा माझा गुरु गजानन, आहे भावाचा भुकेला,नाही कशाचीच अपेक्षा, काव्यपुष्पांनी पुजला।। 

श्री गजानन, जय गजानन।।

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराज