शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Vishwakarma Jayanti 2024: या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार भगवान विश्वकर्मा यांची आज जयंती; 'या' मंत्रांचा जप करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 07:00 IST

Vishwakarma Jayanti 2024: व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून विश्वकर्मा जयंतीच्या औचित्यावर जप करा दिलेल्या प्रासादिक मंत्रांचा! 

भगवान विश्वकर्मा हे या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार मानले जातात. चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वास्तूंचे दाखले आहेत. त्यांनी कृष्णाची द्वारका, पांडवांची मयसभा, देवी देवतांसाठी आलिशान महाल, स्वर्गलोक, लंका, हस्तिनापूर, इंद्रपुरी, जगन्नाथ पुरी वसवली. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील  कृष्ण, सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ,  भगवान विष्णूंसाठी कवच कुंडल, महारथी कर्ण साठी कवच कुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती.  त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे. त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तूदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते. 

माघे शुकले त्रयोदश्यां दिवापुष्पे पुनर्वसौ।अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥

धर्मशास्त्रानुसार मग शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो. तसेच त्यांच्या आशीर्वादाने काम व्हावे, यासाठी कार्यालयात विश्वकर्मा यांची तसबीरही आढळते. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या प्रतिमेचे सामूहिकपणे साग्रसंगीत पूजन केले जाते. 

आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. पूजा विधी नेहमीचाच आहे. फक्त त्याला काही मंत्रांची जोड द्यावी. जसे की, ॐ आधार शक्तपे नमः , ॐ कूमयि नमः, ॐ अनंतम नमः, ॐ पृथिव्यै नमः। या मंत्रांचे उच्चारण करून मनःपूर्वक नमस्कार करावा आणि या सृष्टीचे त्यांनी सदैव पालन आणि रक्षण करावे, म्हणून प्रार्थना करावी. 

भगवान विश्वकर्मा की जय।।

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३