शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
4
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
5
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
6
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
7
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
8
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
9
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
12
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
13
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
14
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
15
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
16
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
17
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
18
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
19
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
20
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:56 IST

Vijaya Dashami Dasara 2025 Swami Seva: यंदा गुरुवारी विजयादशमी दसरा आला आहे. या दिवशी केलेली स्वामी सेवा अतिशय शुभ पुण्य फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते.

Vijaya Dashami Dasara 2025 Swami Seva: नवरात्राची सांगता होत आहे. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र  असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासुर इ. राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने अवतार घेत नऊ दिवस युद्ध केले. दशमीला महिषासुराचा वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. यंदा, गुरुवारी ०२ ऑक्टोबर २०२५ दसरा आहे. या दिवशी कुळाचार, कुळधर्म याप्रमाणे विजयादशमी साजरी करत असताना श्री स्वामी समर्थ स्मरण आवर्जून करावे. 

३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!

प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. गुरुवारी कोट्यवधी स्वामी भक्त स्वामींची विशेष सेवा करतात. गुरुवारी केलेली स्वामी सेवा, पूजन, नामस्मरण उपासना विशेष मानली जाते. गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. दसरा विजयादशमी या दिवशी स्वामी सेवा करावी अन् काही गोष्टी स्वामींसाठी नक्की कराव्यात, असे सांगितले जाते. 

४ कामे करा, विश्वास ठेवा, अशक्य शक्य होईल । Dussehra 2025 Swami Seva

- गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा. 

- दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी. 

- तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वांत प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर १ जपमाळ म्हणजे १०८ वेळा तारक मंत्रांचा जप करावा. 

- चौथे म्हणजे  स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही, तर तिन्हीसांजेला दिवेलागणीला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी. 

- अगदीच काही नाही, ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रांचा १०८ वेळा (१ जपमाळ) किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा.

गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

- सकाळी लक्ष्मी देवीचे पूजन करावे. तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी लक्ष्मी देवी, स्वामींसमोर दिवा लावावा. तुळशीपाशी दिवा लावावा.

- शक्य असेल तर सकाळी, सायंकाळी किंवा दिवसभरात एकदा लक्ष्मी देवीचे श्रीसुक्त, कनकधारा स्तोत्र अवश्य म्हणावे. लक्ष्मी मंत्रांचा मनापासून जप करावा.

- शक्य असेल तर सायंकाळी स्वामी, लक्ष्मी देवीची आरती करावी. 

- स्वामींवर दृढ विश्वास आणि अपार श्रद्धा ठेवा. 

॥ श्री स्वामी समर्थ ॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Dussehra 2025: Serve Swami, gain blessings; Lakshmi brings prosperity!

Web Summary : Celebrate Dussehra 2025 by serving Swami Samarth. Offer yellow flowers and sweets, chant mantras, visit the math, and perform aartis. Worship Goddess Lakshmi with devotion for blessings and prosperity. Believe in Swami for impossible tasks to become possible.
टॅग्स :Dasaraदसराshree swami samarthश्री स्वामी समर्थspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधीNavratriनवरात्रीNavratri Mahotsav 2025शारदीय नवरात्रोत्सव २०२५chaturmasचातुर्मास