शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वसुधैव कुटुंबकम् अनुभवलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:13 IST

अनेक आदिवासी बंधू-भगिनी शिक्षक-शिक्षिका बनून, तर काही शासकीय आस्थापनात नोकऱ्या करून मुख्य प्रवाहात येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.

- फा. फ्रान्सिस दिब्रिटोमानवी प्रजाती जितक्या प्राचीन तितक्या त्यांच्या संस्कृती अधिक संपन्न असतात, हा अनुभव १९६८ मध्ये आला. कार्यानुभवासाठी आम्ही तीन-चार ब्रदर्स तलासरीच्या सावरपाडा पाड्यावर गेलो होतो. आदिवासीच्या झोपडीत राहण्याची सोय होती. कुडाच्या भिंती, सारवलेली जमीन व झावळ्यांचे छप्पर अशी ती झोपडी. रात्री आम्ही ओटीवरच झोपत असू. त्या ओटीला लागून शेळ्या-मेंढ्या बांधलेल्या होत्या. दारासमोर निष्ठावान कुत्रा राखण करीत होता. ‘वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेचा जिवंत अनुभव घेत होतो. दिवस उन्हाळ्याचे होते, तरी उत्तररात्री गार वारा सुटला होता. आत आदिवासी कुटुंब डाराडूर झोपलं होतं. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने पाडा जागा झाला. आम्ही विहिरीवर जाऊन चूळ भरली. झुडपाच्या काडीने दात स्वच्छ करून इतर आन्हिके पार पाडली. खऱ्या अर्थाने आदिवासी जीवन जगलो. आदरातिथ्याने भारावून गेलो. मनाच्या श्रीमंतीची प्रचिती आली. निरोपाच्या आदल्या दिवशी मटनाचा बेत केला होता. निरोप देताना त्यांचीही मने भरून आली होती. आमच्या प्रेमाची आठवण व कृतज्ञता म्हणून आम्ही काही नोटा त्यांच्या हातात कोंबण्याचा प्रयत्न केला; पण व्यर्थ. उलट पाहुण्यांना रिकाम्या हाती कसं पाठवायचं या जाणिवेने त्यांनी परसातील भाजी दिली. सोयी-सुविधांपासून हे पाडे कोसो मैल दूर आहेत. पंचवार्षिक योजना त्यांच्यापर्यंत तितक्याशा पोहोचल्या नव्हत्या. मात्र, मिशनऱ्यांनी साठ-सत्तर वर्षांपूर्वी हे पाडे कर्मभूमी मानली. आरोग्य व शिक्षणाशिवाय आदिवासींचा विकास अशक्य आहे हे लक्षात घेऊन कार्य सुरू केले. गोदाताई परूळेकर यांनी सामाजिक जाणिवा रुजविण्यासाठी येथे अथक प्रयत्न केले. आदिवासी संस्कृतीत अनेक संपन्न गोष्टी आहेत. त्यांची चित्रशैली जगात गाजतेय. दिलीप बाहोटेने जर्मनीत आदिवासी चित्रशैलीचा आविष्कार केला आहे. तसेच अनेक आदिवासी बंधू-भगिनी शिक्षक-शिक्षिका बनून, तर काही शासकीय आस्थापनात नोकऱ्या करून मुख्य प्रवाहात येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.