शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

Vastushastra : स्वयंपाकघरातला वावर बनवा आनंदी आणि उत्साही, वापरा 'या' खास किचन टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:30 IST

Vastu tips : गृहिणी असो नाहीतर बॅचलर्स, पोटापाण्यासाठी स्वयंपाक घराचा उंबरठा ओलांडणे ओघाने आलेच. तिथले वातावरण आनंदी असेल, तरच तो आनंद स्वयंपाकातही उतरेल. त्यासाठी खास टिप्स!

>> कांचन दीक्षित 

१. किचनची रचना बदलून पहा.स्वयंपाक करताना रोज तेच दृश्य दिसलं की कंटाळा येणारच. वस्तू, भांडी, डबे यांची स्वच्छता आणि आवराआवर  करताना जागा बदलून पहा. एखादं लहानसं रोप लावा,उत्साह देणारे सुविचार लिहा. फॅमिली फोटो दिसेल असा ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे नको असलेल्या जास्तीच्या वस्तू समोर ठेऊ नका, समोर जितक्या वस्तू जास्त दिसतात तेवढा थकवा येतो. लेबल लावा, एकसारख्या वस्तू शेजारी ठेवा, सगळं कॅटेगरी प्रमाणे लावा,उदा. मसाले सगळे एका ठिकाणी,डाळी एका कप्प्यात शेजारी, इ... 

२. आपण कपडे जुने झाले की बदलतो नविन आणतो पण ब-याचदा भांडी तीच तीच वापरतो पोचे पडलेली,काळी झालेली थोडक्यात एक्सपायरी डेटसुध्दा निघून गेलेली भांडी चालताहेत तोवर चालवत असतो,त्यामुळे किचनमधे कंटाळा येतो. अधूनमधून नविन खरेदी केली की स्वयंपाकाला उत्साह येतो. तवा,पोळपाट लाटणं,कढई,चाकूसुरी सोलाणं बदलून पहा.लहानपणी शाळेचं नविन दप्तर सॅक आणलं की शाळेत जायला उत्साह वाटायचा तसंच आहे हे!

३. उत्साहाच्या वेळा निवडा.स्वयंपाक करण्यासाठी साधारण उत्साह कधी असतो ते पहा. उदा. सकाळी दहाच्या आत स्वयंपाक करायला उत्साह वाटत असेल तर सकाळचा पूर्ण आणि संध्याकाळचा ८०% स्वयंपाक तेव्हाच करुन ठेवा. थोडं फ्रिजमधे नियोजन करा. संध्याकाळी उत्साह वाटत असेल तर हाच नियम सकाळसाठी करा आधीच तयारी करुन ठेवा.

४.  स्वयंपाकात दोन कामं असतात एक प्रत्यक्ष स्वयंपाक आणि दुसरं आवराआवर स्वच्छता. सगळा स्वयंपाक झाल्यावर स्वच्छतेचा कंटाळा येतो, यावर उपाय म्हणजे एक काम कुकिंग आणि एक काम क्लिनिंग असं करा.  उदा.भाजी केली, थोडी भांडी धुतली,पोळ्या केल्या ओटा आवरला,असं आलटून पालटून काम केल्यानं कंटाळा कमी होईल शिवाय पसारा पाहून दडपण येणार नाही.

५. स्वयंपाक करताना सोशल मिडियापासून लांब रहा,सलग तास दोन तास काम आटोपून मगच फोन हातात घ्या. यानं कामं पसरणार नाहीत,एखादं काम रटाळ झालं की ते काम करायचा उत्साह संपतो.

६. लहान मुलं असतील तर ती बिझी असताना किंवा दुसरं कुणी त्यांना सांभाळत असेल तेव्हा स्वयंपाक करुन फ्री व्हा,मुलांना सांभाळत थांबत थांबत स्वयंपाक करायचा कंटाळा येतो.दोन कामं एकत्र केल्याचा हा थकवा असतो.

७. स्वयंपाक करताना छान पोशाख करा. वाटल्यास आवडीचं परफ्युम लावून हे काम सुरु करा,कंटाळा पळून जाईल. छान वाद्य संगीत लावा,यु ट्युबवर स्वयंपाक करताना लावण्याचे खास म्युझिक व्हिडिओसुध्दा आहेत.

८. स्वयंपाकाच्या तयारीसाठी आणि स्वच्छतेसाठी मदत घ्या. प्रत्यक्ष स्वयंपाकापेक्षा बाकीची मदत महत्वाची असते,कामाचा ताण आणि थकवा यानं निम्मा होतो.

९.साध्या सोप्या नविन रेसिपी अधूनमधून  करून पहा यानं नाविन्य वाटेल. आळस आणि थकव्यानं आलेला कंटाळा यातला फरक समजून मेनू ठरवा,साध्या सोप्या वन डिश मील रेसिपीज जास्त कंटाळा आला की करण्यासाठी राखून ठेवा,हुकुमाचे एक्के आधीच वापरुन संपवू नका.

१०. स्वयंपाकघर आणि स्वयंपाक याविषयी कृतज्ञतेचे विचार ठेवा,त्याचे सकारात्मक फायदे आठवा. आठवड्यातून /महिन्यातून हक्कानं सुट्टी घ्या. इतरांनाही तिथे प्रयोग करु द्या. या सुट्टीनं फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्याचा उत्साह मिळेल. प्रयत्न केले तर स्वयंपाकातही मेडिटेशन सापडेल.

टॅग्स :kitchen tipsकिचन टिप्सVastu shastraवास्तुशास्त्र