अनेकांना असं वाटतं की घरात मनी प्लांट लावला की पैसा येतो. पण वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट लावणं पुरेसं नाही, तर तो योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर मनी प्लांट चुकीच्या पद्धतीने लावला, तर त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
हे ही वाचा : Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
जाणून घ्या, मनी प्लांटशी संबंधित 'या' ५ चुका ज्या तुमची प्रगती रोखू शकतात:
१. चुकीची दिशा: ईशान्य कोपरा टाळा
मनी प्लांट कधीही घराच्या ईशान्य (North-East) कोपऱ्यात लावू नका. ही दिशा देवांची मानली जाते आणि या दिशेला मनी प्लांट लावल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
योग्य दिशा: मनी प्लांट नेहमी घराच्या अग्नेय (South-East) कोपऱ्यात लावावा. ही दिशा गणपती आणि शुक्राची मानली जाते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
२. वेली जमिनीवर पसरू देऊ नका
मनी प्लांटच्या वेली जमिनीला टेकणे किंवा जमिनीवर पसरणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि प्रगतीत अडथळे येतात.
उपाय: मनी प्लांटला एखाद्या काठीचा किंवा दोरीचा आधार द्यावा, जेणेकरून वेली वरच्या दिशेला वाढतील. वर जाणारी वेल ही प्रगतीचे प्रतीक आहे.
हे ही वाचा : Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
३. सुकलेली पाने त्वरित काढून टाका
जर मनी प्लांटची पाने पिवळी पडली असतील किंवा सुकली असतील, तर ती लगेच काढून टाका. सुकलेली पाने नकारात्मकता आकर्षित करतात आणि घरातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि पैशांवर परिणाम करतात.
४. कोणालाही मनी प्लांट भेट देऊ नका
वास्तुशास्त्रानुसार, स्वतःच्या घरातील मनी प्लांट कधीही कोणाला भेट (Gift) देऊ नये किंवा दुसऱ्याच्या घरातून चोरून आणू नये. असं मानलं जातं की, मनी प्लांट कोणाला दिल्याने तुमच्या घरातील 'बरकत' किंवा आर्थिक समृद्धी दुसऱ्याकडे जाते.
५. घराच्या बाहेर लावणे टाळा
मनी प्लांट हा मूळतः घराच्या आत (Indoor) लावण्यासाठीचा प्लांट आहे. तो घराबाहेर किंवा थेट कडक उन्हात लावल्याने सुकण्याची शक्यता असते. सुकलेला मनी प्लांट हा वास्तुदोष निर्माण करतो, ज्यामुळे गरिबी ओढवू शकते.
हे ही वाचा : Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांकडे असते समोरच्याचं मन वाचण्याची दैवी शक्ती!
मनी प्लांटसाठी खास टिप:
मनी प्लांट नेहमी लाल किंवा हिरव्या रंगाच्या बाटलीत/कुंडीत लावावा. जर तुम्ही तो निळ्या रंगाच्या बाटलीत लावला, तर पैशांचा ओघ वाढण्यास मदत होते, असे मानले जाते.
Web Summary : Ensure your money plant attracts wealth by placing it correctly. Avoid the Northeast direction and letting vines touch the ground. Remove dead leaves, never gift it, and keep it indoors. Prosperity follows correct placement and care.
Web Summary : मनी प्लांट को सही दिशा में लगाकर धन आकर्षित करें। ईशान कोण से बचें और लताओं को जमीन पर न छूने दें। सूखे पत्ते हटाएं, कभी उपहार न दें, और इसे घर के अंदर रखें। सही जगह और देखभाल से समृद्धि आती है।