शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: स्वयंपाकघरात 'हे' छोटेसे बदल केले तरी तिथला वावर आल्हाददायक होईल हे नक्की!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:03 IST

Kitchen Tips: उन्हाळ्यात घामाच्या धारा लागलेल्या असताना किचनमध्ये थांबणेही नकोसे वाटते; अशा वेळी या स्मार्ट ट्रीक्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.

वाढत्या उन्हामुळे सतत पंख्याखाली, कूलर समोर नाहीतर एसीजवळ बसून राहावे असे वाटते. इतर कामाच्या वेळी तसे करणे जमेलही, पण स्वयंपाक करताना मात्र गॅसला वारा लागू नये म्हणून घाम गाळत स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे चिडचिड होते आणि किचन मध्ये अक्षरश: पाऊलही ठेवू न्ये असे वाटते. तेथील वावर आल्हाददायक व्हावा म्हणून या टिप्स फॉलो करा. 

१. किचनची रचना बदलून पहा.स्वयंपाक करताना रोज तेच दृश्य दिसलं की कंटाळा येणारच. वस्तू, भांडी, डबे यांची स्वच्छता आणि आवराआवर  करताना जागा बदलून पहा. एखादं लहानसं रोप लावा,उत्साह देणारे सुविचार लिहा. फॅमिली फोटो दिसेल असा ठेवा. सर्वात महत्वाचं म्हणजे नको असलेल्या जास्तीच्या वस्तू समोर ठेऊ नका, समोर जितक्या वस्तू जास्त दिसतात तेवढा थकवा येतो. लेबल लावा, एकसारख्या वस्तू शेजारी ठेवा, सगळं कॅटेगरी प्रमाणे लावा,उदा. मसाले सगळे एका ठिकाणी,डाळी एका कप्प्यात शेजारी, इ... 

२. आपण कपडे जुने झाले की बदलतो नविन आणतो पण ब-याचदा भांडी तीच तीच वापरतो पोचे पडलेली,काळी झालेली थोडक्यात एक्सपायरी डेटसुध्दा निघून गेलेली भांडी चालताहेत तोवर चालवत असतो,त्यामुळे किचनमधे कंटाळा येतो. अधूनमधून नविन खरेदी केली की स्वयंपाकाला उत्साह येतो. तवा,पोळपाट लाटणं,कढई,चाकूसुरी सोलाणं बदलून पहा.लहानपणी शाळेचं नविन दप्तर सॅक आणलं की शाळेत जायला उत्साह वाटायचा तसंच आहे हे!

३. उत्साहाच्या वेळा निवडा.स्वयंपाक करण्यासाठी साधारण उत्साह कधी असतो ते पहा. उदा. सकाळी दहाच्या आत स्वयंपाक करायला उत्साह वाटत असेल तर सकाळचा पूर्ण आणि संध्याकाळचा ८०% स्वयंपाक तेव्हाच करुन ठेवा. थोडं फ्रिजमधे नियोजन करा. संध्याकाळी उत्साह वाटत असेल तर हाच नियम सकाळसाठी करा आधीच तयारी करुन ठेवा.

४.  स्वयंपाकात दोन कामं असतात एक प्रत्यक्ष स्वयंपाक आणि दुसरं आवराआवर स्वच्छता. सगळा स्वयंपाक झाल्यावर स्वच्छतेचा कंटाळा येतो, यावर उपाय म्हणजे एक काम कुकिंग आणि एक काम क्लिनिंग असं करा.  उदा.भाजी केली, थोडी भांडी धुतली,पोळ्या केल्या ओटा आवरला,असं आलटून पालटून काम केल्यानं कंटाळा कमी होईल शिवाय पसारा पाहून दडपण येणार नाही.

५. स्वयंपाक करताना सोशल मिडियापासून लांब रहा,सलग तास दोन तास काम आटोपून मगच फोन हातात घ्या. यानं कामं पसरणार नाहीत,एखादं काम रटाळ झालं की ते काम करायचा उत्साह संपतो.

६. लहान मुलं असतील तर ती बिझी असताना किंवा दुसरं कुणी त्यांना सांभाळत असेल तेव्हा स्वयंपाक करुन फ्री व्हा,मुलांना सांभाळत थांबत थांबत स्वयंपाक करायचा कंटाळा येतो.दोन कामं एकत्र केल्याचा हा थकवा असतो.

७. स्वयंपाक करताना छान पोशाख करा. वाटल्यास आवडीचं परफ्युम लावून हे काम सुरु करा,कंटाळा पळून जाईल. छान वाद्य संगीत लावा,यु ट्युबवर स्वयंपाक करताना लावण्याचे खास म्युझिक व्हिडिओसुध्दा आहेत.

८. स्वयंपाकाच्या तयारीसाठी आणि स्वच्छतेसाठी मदत घ्या. प्रत्यक्ष स्वयंपाकापेक्षा बाकीची मदत महत्वाची असते,कामाचा ताण आणि थकवा यानं निम्मा होतो.

९.साध्या सोप्या नविन रेसिपी अधूनमधून  करून पहा यानं नाविन्य वाटेल. आळस आणि थकव्यानं आलेला कंटाळा यातला फरक समजून मेनू ठरवा,साध्या सोप्या वन डिश मील रेसिपीज जास्त कंटाळा आला की करण्यासाठी राखून ठेवा,हुकुमाचे एक्के आधीच वापरुन संपवू नका.

१०. स्वयंपाकघर आणि स्वयंपाक याविषयी कृतज्ञतेचे विचार ठेवा,त्याचे सकारात्मक फायदे आठवा. आठवड्यातून /महिन्यातून हक्कानं सुट्टी घ्या. इतरांनाही तिथे प्रयोग करु द्या. या सुट्टीनं फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागण्याचा उत्साह मिळेल. प्रयत्न केले तर स्वयंपाकातही मेडिटेशन सापडेल.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र