शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: घरात रोजची भांडणं होत असतील तर वास्तुशास्त्रात दिलेले उपाय जरूर करून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 12:32 IST

Vastu Shastra: घर आनंदी असावे, शांत असावे, घरात सर्वांचे संबंध सहृदयतेचे असावे असे सर्वानाच वाटते, तसे नसेल तर वास्तू शास्त्राने दिलेले तोडगे करून बघा. 

असे म्हटले जाते की ते प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळविणे कठीण आणि मिळाले तर टिकवून ठेवणे त्याहून कठीण आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, लोक प्रेम विवाह करतात परंतु तरीही ते आनंदी नाहीत असे दिसून येते. २४ तास एकत्र राहिल्यानंतर, ते एकमेकांचे दोष काढण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये क्षणो क्षणी भांडणे सुरू होतात. ही भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. वास्तू शास्त्राने यावर काही उपाय सांगितले आहेत, ते करून पहा. 

या उपायांसह प्रेम विवाहातील समस्या दूर करा 

>>लग्नानंतर रोजचे वाद होत असतील, तर गरजूंना कणिक आणि तेलाचे दान करा. हा उपाय केवळ प्रेम विवाह झालेल्यांनाच नाही तर ठरवून विवाह केलेल्यांनाही वापरता येईल. या उपायाने वाद कमी होऊन परस्परांचे संगनमत होण्यास मदत होते. मात्र हे दान करताना नवरा बायको एकत्र असणे गरजेचे आहे. 

>>लग्नसंबंध पुन्हा सुधारण्यासाठी तुम्ही जोडीदाराला एखादी भेट वस्तू देणार असाल, तर ती वस्तू काळया किंवा निळ्या रंगाची असणार नाही याची काळजी घ्या. हे रंग नात्यावर नकारात्मक परिणाम करतात. 

>> दररोज मीठ मिश्रित पाण्याने फरशी पुसा. याशिवाय रोज सायंकाळी कापूर जाळण्याने नकारात्मक उर्जा दूर होईल. 

>> दर शुक्रवारी राधा-कृष्णाच्या मंदिरात जा. तेथे पिवळ्या रंगाची फुले व खडीसाखर अर्पण करा, यामुळे विवाहातील अडचणी दूर होतील.

>> आपल्या शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये राधा कृष्णाची मूर्ती, तसबीर किंवा मोरपीस लावा. त्यामुळेही सकारात्मक वातावरण होऊन वाद निवळतो. 

>> बेडरूममध्ये घरात वापरण्याच्या चपलाही वापरू नका. त्या खोलीबाहेर ठेवा. तसेच मोबाईल, लॅपटॉप इ. गॅझेट खोलीबाहेर ठेवून नात्याला वेळ द्या. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रmarriageलग्न