शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

८ मार्च पासून वसंतोत्सव सुरू होत आहे, या ऋतूच्या आगमनाने आपल्या आयुष्यात कोणते बदल घडतात? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 17:54 IST

वसंत ऋतू हा सहा ऋतूंचा राजा. प्रत्येकाच्या आयुष्यात वसंत फुलावा असे म्हणतात, पण का? ते जाणून घ्या!

वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल, तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत 'ऋतुनां कुसुमाकर:' असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. कविश्वर जयदेव तर वसंत ऋतूचे वर्णन करताना थकत नाहीत.

सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वत:च्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वत:कडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.  मानवाने स्वत:च्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्गात एक असा अजब जादू आहे की, जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवतो. जर या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो.

निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो. 

निसर्ग सुख दु:खाच्या द्वंद्वापासून दूर आहे. वसंत असो अथवा वर्षा! वेगवेगळ्या रूपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभूस्पर्श प्राप्त करून पुâलून उठतो. जीवनातही जर प्रभूचा स्पर्श झाला, प्रभूचा हात फिरला तर संपूर्ण जीवनच बदलून जाईल. जीवनात वसंत फुलून उठेल. जीवनातून दु:ख, दैन्य, दारिद्रय क्षणभरात दूर होईल.

प्रभुस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतु असतो आणि तो म्हणजे वसंत! त्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहते आणि ती म्हणजे यौवन! परंतु निसर्गाची सुंदरता व मानवाची रसिकता यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाल नाही तर ही सुंदरता व रसिकता विलासाचा मृृदुल पंथ निर्माण करून मानवाला विनाशाच्या गर्तेतदेखील ढकलून देईल. म्हणून वसंताच्या संगीतात गीतेचा सूर मिसळला पाहिजे.

वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वत:च्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.

वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर संगम. कल्पना व वास्तवता यांचा सुगम समन्वय. खNया महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणाऱ्या साधनांचे फारच महत्त्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखी वर पाहू नये इतका जडही असत नाही. जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो, तो संत!

यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण बसंताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल.