शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Vasant Panchami 2026: सरस्वती पूजन, विठ्ठल-रुक्मिणी विवाह अन् वसंतोत्सव; पाहा, महत्त्व-मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 13:04 IST

Vasant Panchami 2026 Vitthal Rukmini Vivah: भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण-उत्सव निसर्गावर आधारित आहेत, याची पूरेपूर अनुभूती मिळते.

Vasant Panchami 2026: २३ जानेवारी २०२६ रोजी वसंत पंचमी आहे. माघ महिन्यातील शुद्ध पंचमी तिथी वसंत पंचमी, श्री पंचमी म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमधील विविधता अनन्य साधारण आहे, असेच म्हणावे लागेल. भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण-उत्सव निसर्गावर आधारित आहेत, याची पूरेपूर अनुभूती मिळते. 

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दितासा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥

माघ शुक्ल पंचमी ही वसंत पंचमी म्हणून ओळखली जाते. वसंत ॠतूच्या शुभारंभाची ही तिथी होय. चैत्र व वैशाख हे वसंत ॠतूचे महिने मानले गेले आहेत. परंतु माघ महिन्यात उत्तरायणाबरोबर वसंताची चाहूल लागते व वातावरण उत्साहवर्धक होऊ लागते. वसंत पंचमीला सरस्वती पूजन केले जाते. माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती पृथ्वीतलावर अवतरली. यामुळे माघ महिन्यातील पंचमी सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक ह्या दिवशी सरस्वतीच्या प्रतिमा पूजतात. सरस्वतीचा नवसही करतात. मुलांचा विद्यारंभ या तिथीपासूनच होतो. 

वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ

वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो. वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. वसंत ऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव, असे उत्सव करण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात. वसंताचा उत्सव हे आशावादाचे प्रतीक आहे. वसंत म्हणजे आशा व सिद्धी यांचा सुंदर मिलाफ आहे, असे म्हटले जाते. 

वसंत पंचमीला नवान्नेष्टी

काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात. शेतातून नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या देवतेला अर्पण करून नंतर भक्षण करावयाच्या असतात. वसंत ॠतूत निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणामुळे उल्हसित झालेल्या मनांचा आविष्कार विविध प्रकारच्या मनोरंजक कार्यक्रमांतून व्यक्त होतो. आनंद प्रकटीकरण हाच या सणाचा उद्देश दिसतो. काही ठिकाणी उत्साही मुले होळीसाठी लाकडे, गवत वगैरे गोळा करण्यास वसंत पंचमीपासून सुरुवात करतात.  

वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव

वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. वसंत ॠतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते. त्या पानाफुलांनी बहरतात. त्याप्रमाणेच लोकांच्या मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होऊ लागतात. हा उत्सव ह्या संक्रमणस्थितीचा द्योतक आहे. निसर्गसृष्टीप्रमाणेच मानवी जीवनात आनंद व उत्साह वृद्धिंगत व्हावा, या उद्देशानेच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा असावी. दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे.

पंढरपुरात वसंत पंचमीला देवाचा लग्नसोहळा रंगतो

वसंत पंचमीला विठ्ठल-रखुमाई यांचा विवाह झाला, अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. पंढरपुरात वसंत पंचमीला हा देवाचा लग्नसोहळा रंगतो. पांढऱ्याशुभ्र पोषाखात अलंकाराने नटलेला विठोबा आणि सालंकृत रखुमाईची मूर्ती यांच्यामध्ये आंतरपाट धरून लग्न लावले जाते. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत विठ्ठलाला शुभ्र पोषाख करून गुलाल उधळण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत प्रेमाचे वेगळे महत्त्व आहे. वसंत पंचमीचा दिवस प्रेमात, आनंदात घालवतात. भारतात अनेक ठिकाणी रती आणि कामदेव यांचे पूजन करण्याची प्रथा आहे. हा भारतीयांचा व्हॅलेंटाइन डे आहे असे म्हटले तरी हरकत नाही, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणतात.

महर्षि वाल्मिकी, श्रीकृष्ण यांची ऋतुराज वसंताची बिरुदावली

महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहारी चित्रण केले आहे. श्रीकृष्णानेही गीतेत ऋतूला कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतमध्ये लोभस बनतो. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंगांची उधळण करत वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. कालिदासाच्या काळात वसंत पंचमीला 'मदनोत्सव' असे म्हटले जात असे. या दिवशी कामदेवतेची पूजा करण्याची प्रथा होती. हळूहळू ही परंपरा लोप पावली, असे सांगितले जाते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vasant Panchami 2026: Saraswati Puja, Vitthal-Rukmini Wedding, Spring Festival Explained

Web Summary : Vasant Panchami marks spring's arrival, honoring Saraswati. Celebrations include deity worship, cultural programs, and, in Pandharpur, a symbolic Vitthal-Rukmini wedding. It's a time for new beginnings and joyful festivities, mirroring nature's renewal. Some view it as India's Valentine's Day, celebrating love.
टॅग्स :Indian Festivalsभारतीय उत्सव-सणspiritualअध्यात्मिकPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPuja Vidhiपूजा विधीLord Krishnaभगवान श्रीकृष्ण