Tulasi Plant: उन्हाळ्याच्या दिवसात कढीलिंबाच्या तेलाचे दोन थेंब तुळशीला देतील नवसंजीवनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 07:00 AM2024-03-29T07:00:00+5:302024-03-29T07:00:02+5:30

Tulasi Plant Tips: जर तुमच्या तुळशीला कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तुम्हीदेखील कढीलिंबाची तेलाचा सांगितल्याप्रमाणे उपयोग करा. 

Tulasi Plant: A couple of drops of curry lemon oil will rejuvenate Tulsi on hot summer days! | Tulasi Plant: उन्हाळ्याच्या दिवसात कढीलिंबाच्या तेलाचे दोन थेंब तुळशीला देतील नवसंजीवनी!

Tulasi Plant: उन्हाळ्याच्या दिवसात कढीलिंबाच्या तेलाचे दोन थेंब तुळशीला देतील नवसंजीवनी!

तुळशीचे रोप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. ही वनस्पती औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण आहे. यामुळेच तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक अंगणात असते. मात्र, व्यग्र दिनचर्येमुळे अनेकदा तुळशीची योग्य काळजी घेता येत नाही. त्यामुळे रोप सुकायला लागते. इतकेच नाही तर काही वेळा तुळशीवर कीडही लागते, ज्यामुळे हळूहळू संपूर्ण रोप खराब होते. अशा परिस्थितीत, या वनस्पतीची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आणि यासाठी आपण बाजारातून कीटकनाशके आणणे आणि रोपांवर फवारणे आवश्यक नाही. तर घरातलेच कढीलिंबाचे तेलही वापरू शकता. पण, त्याचा वापर कसा करायचा ते सविस्तर जाणून घेऊया.

तुळशीच्या रोपाला कडुलिंबाचे तेल घातल्यास काय होते?

वास्तविक, कडुलिंबाचे तेल झाडावरील कीटकांपासून मुक्त होण्याचे काम करते. काही लोक बाजारातून कीटकनाशके आणतात आणि त्यांची झाडावर फवारणी करतात, ज्यामुळे तुम्ही तुळशीची पाने इतर कशासाठीही वापरू शकत नाही. रसायन असलेले कीटकनाशक फवारण्याऐवजी, तुळशीच्या रोपावरील  किडे दूर करण्यासाठी कढीलिंबाचे तेल वापरणे चांगले. हे कीटकांविरूद्ध प्रभावी प्रतिबंधक म्हणून कार्य करते. याशिवाय तुळशीच्या पानांमध्ये कोणतीही रासायनिक क्रिया होत नाही. चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या रोपात हे तेल कोणत्या पद्धतीने वापरणे चांगले.

कढीलिंबाचे तेल वापरण्याची योग्य पद्धत : 

तुळशीच्या झाडावर कढीलिंबाचे तेल फवारण्यासाठी प्रथम स्प्रे तयार करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या आणि त्यात 2 चमचे कढीलिंबाचे तेल घाला. नंतर, चमच्याच्या मदतीने ते चांगले मिसळा. यानंतर, घरात पडलेल्या रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये ते रसायन भरा. आता तुळशीच्या पानांवर आणि संक्रमित भागांवर त्याचा वापर करा. त्यामुळे तुळशीच्या रोपातून किडे लवकर निघून जातात. तुमच्या तुळशीच्या रोपाला कीड लागली नसेल पण तुम्हाला कीड लागू नये म्हणून काळजी घ्यायची असेल तर कढीलिंबाची पाने बारीक करून तुळशीच्या रोपात घालून ठेवा. 

Web Title: Tulasi Plant: A couple of drops of curry lemon oil will rejuvenate Tulsi on hot summer days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.