शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Tuesday Vastu Tips: मंगळवारचे 'हे' उपाय दूर करतील घराचे अपाय, वाचा ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 07:00 IST

Tuesday Vastu Tips: मंगळवार हा जरा गणपती बाप्पाचा तसा हनुमंताचासुद्धा, दिलेले उपाय करा आणि हनुमंतावर सगळी काळजी सोडा!

मंगळवार हा मंगलमुर्ती गणरायाला समर्पित आहे तसा संकटमोचन हनुमानालाही दिला आहे. कारण हनुमंत हे देखील मंगलकारी आहेत. तसे वर्णन हनुमान चालीसामध्येही आढळते. म्हणून ज्योतिष शास्त्राने मंगळवारचे काही उपाय दिले आहेत. ते केले असता आपले भय, चिंता दूर होऊन निश्चिन्तपणे जगण्याचा मार्ग सुकर होतो. ते उपाय कोणते ते पाहू. 

ज्योतिषशास्त्रात मंगळवारी गणपती बाप्पाबरोबरच हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी बजरंगबलीला गूळ खोबरे अर्पण करावे. रुईच्या पानाफुलांची हार घालावा आणि तेलाचा दिवा लावावा. यामुळे हनुमंत प्रसन्न होतात. त्यांच्या कृपेने बिघडलेली कामेही होऊ लागतात, जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. त्यासाठी आणखीही काही प्रभावी तोडगे दिले आहेत, कोणते ते पाहू. 

शनि महादशाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय : जर कुंडलीत शनिदोष असेल, शनीची साडेसाती, धैय्या किंवा महादशा चालू असेल आणि त्याचा जीवनावर वाईट परिणाम होत असेल तर १०८ वेळा पिवळ्या चंदनाच्या माळेने राम नामाचा जप करावा. ती माळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या माळेने जप करावा यामुळे शनि आणि राहूच्या नकारात्मक प्रभावापासून आराम मिळतो.

कामातील अडथळे आणि समस्या दूर करण्याचे उपाय : मंगळवारी सकाळी स्नान करून हनुमान मंदिरात जाऊन हनुमंतासमोर तेलाचा दिवा लावा, हार, शेंदूर, नैवेद्य झाल्यावर  शक्य तितक्या वेळा पूर्ण भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करा. त्यामुळे कामात तसेच आनंदाच्या मार्गात येणारे अडथळे लवकरच दूर होतील.

अकाली मृत्यूचे संकट दूर करण्याचा उपाय : मंगळवारी ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घ्या. देशी गायीच्या तुपाचा दिवा लावा आणि नंतर सुंदरकांड पाठ करा. हा उपाय सतत ११ मंगळवार केल्यास अकाली मृत्यू, अपघात-रोगाचा धोका दूर होतो.

आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय : दर मंगळवारी गायीला चारा, कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यावर गरीब, गरजू लोकांना अन्नदान करा. हे किमान ११ मंगळवार करा, तुमचे उत्पन्न वाढू लागेल.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रAstrologyफलज्योतिष