शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आनंद मिळवण्यासाठी स्वतःमध्ये डोकावून पाहणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 12:26 IST

“खरा आनंद” आणि “खोटा आनंद” अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही जेव्हा सत्यात असता, तेव्हा तुम्ही आनंदात असता.

आपण असे म्हणता की जेव्हा मनुष्य आनंदी असतो, तेव्हा तो अधिक जुळवून घेणारा, अधिक मुक्त, “मी”पणाच्या ओझ्याखाली कमी दबलेला असतो. हा आनंद नक्की काय आहे? सद्गुरु, आपण या आनंदाचे वर्णन करू शकता का?

सद्गुरु: मी तुम्हाला कसे सांगू? हा प्रश्न खरं म्हणजे आनंदाच्या स्वरुपाच्या विशिष्ट गैरसमजुतीतून उदभवू शकतो. आज अगदी मनाला उत्तेजित करणार्‍या औषधं, मादकपदार्थांनासुद्धा “आनंद” असे नाव देण्यात येते. तुम्ही जेव्हा “आनंद” असे म्हणता, तेव्हा पाश्चात्य देशातील लोकांना त्यांना असे वाटते की तुम्ही एखाद्या विशिष्ट औषधी गोळी किंवा औषधाबद्दल बोलता आहात.

“खरा आनंद” आणि “खोटा आनंद” अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही जेव्हा सत्यात असता, तेव्हा तुम्ही आनंदात असता. जेव्हा तुम्ही खरोखरच सत्याच्या सान्निध्यात असता, तेव्हा साहजिकच तुम्ही आनंदात असाल. आनंदी असणे आणि आनंदी नसणे ही तुमच्यासाठी तुम्ही सत्यात आहात की नाही याची लिटमस टेस्ट करण्यासारखे आहे. हा प्रश्न कदाचित एका विशिष्ट मानसिकतेतून येतो: “मी जर सूर्यास्त पहात असेन, मी आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेव्हा प्रार्थना करतो, मी जर आनंदी झालो, तर तो खरा आनंद आहे का? किंवा मी जेव्हा ध्यान करत असतो आणि आनंदी होतो, तेव्हा तो खरा आनंद असतो का?

बहुतेक लोकांमध्ये सुखोपभोग म्हणजेच आनंद अशी गैरसमजूत आहे. सुखोपभोग तुम्ही फार काळ टिकवून ठेवू शकणार नाही. पण आनंद ही अशी अवस्था आहे जी कशावरही अवलंबून नाही. सुखोपभोग हा नेहेमी कशावर किंवा कोणावर तरी अवलंबून असतो. पण आनंद हा कशावर किंवा कोणा व्यक्तीवर अवलंबून नाही. तो तुमचा प्राकृतिक स्वभावच आहे. एकदा तुम्ही त्याच्या सान्निध्यात आलात की तुम्ही त्यात स्थित होता, एवढंच.

आनंद हा काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगा नाहीये, तो तुम्ही तुमच्या आतच, खोलवर शोधून काढता

आनंद हा काही तुम्ही बाहेरून मिळवण्याजोगा नाहीये, तो तुम्ही तुमच्या आतच, खोलवर शोधून काढता. ती अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या आत खोलवर खणून शोधून काढता. हे जणू एक विहीर खोदण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमचं तोंड उघडून पावसाचे थेंब तोंडात पडण्याची वाट बघत बसलात, तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काही थेंब तोंडात पडू शकतात. पण तोंड उघडून पावसाची वाट बघत तहान भागवण्याची ही एक अगदी दयनीय आणि निराशजनक स्थिती आहे. त्याशिवाय पाऊस हा काही शाश्वतपणे पडणारा नाही. एखाद, दोन तास पडेल आणि थांबणार.

यासाठीच तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणता – जेणेकरून वर्षभर पाणी उपलब्ध असेल. जे काही तुम्ही खरा परमानंद म्हणता ते एवढंच आहे, तुम्ही आपली स्वतःची अशी एक विहीर खणली आहे आणि तुम्हाला पाण्याचा सापडलं आहे जे तुम्हाला सदासर्वदा तृप ठेवेल. आता तुम्ही पाऊस पडत असताना तोंड उघडून बसत नाही. नाही. आता तुमच्याजवळ निरंतर पाण्याचा साठा आहे. हाच आहे परमानंद.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक