आज लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी धर्म आणि विज्ञान विषयावर मुक्त चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 07:20 IST2020-12-12T07:20:00+5:302020-12-12T07:20:01+5:30
आपणही मनातील शंका दूर करून घ्या आणि आजच्या live सत्रात जरूर सहभागी व्हा. सायंकाळी ७ वाजता, लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!

आज लोकमत भक्ती युट्युब चॅनेलवर डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्याशी धर्म आणि विज्ञान विषयावर मुक्त चर्चा!
'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर', अशी आपल्याकडे एक म्हण आहे. म्हणजेच, कोणत्याही गोष्टीला सबळ पुरावा असला पाहिजे. धर्माशी निगडित अनेक गोष्टींनाही शास्त्रीय आधार आहे. परंतु कालौघात शास्त्र मागे राहिले आणि कर्मकांडांनी जोर धरला. त्यामुळे धर्म आणि विज्ञान असे दोन गट पडले. या दोन्ही शाखा वेगवेगळ्या आहेत, की परस्परपूरक, हे समजावून सांगण्यासाठी, डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले लोकमत भक्ती युट्युब चॅनेलच्या माध्यमातून १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या भेटीस येत आहेत. त्यावेळेस अभिनेत्री गौरी किरण या डॉ. राजीमवाले यांच्याशी संवाद साधणार आहेत.
डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले हे शिवपुरी अक्कलकोटचे परम सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत. तसेच ते अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ गुरूंच्या वंशातील आहेत. राजीमवाले कुटुंब मध्य भारतातील महाकोसल येथील राजेशाही कुटुंब म्हणून ओळखले जाते. १८०० सालापासून जनकल्याणासाठी झटण्याची परंपरा या कुटुंबाला लाभली आहे.
अक्कलकोट येथे अग्निहोत्राच्या प्राचीन सर्वोत्तम प्रथेचे डॉ. पुरुषोत्तम यांनी पुनरुज्जीवन केले आणि उपचार, शांतीचा संदेश जगाला देण्यासाठी शिवपुरीच्या आश्रमाची स्थापना केली. त्यांनी आपले संपूर्ण बालपण अक्कलकोटच्या मठात आध्यात्मिकदृष्ट्या भारावलेल्या वातावरणात, महान योगी व संतांसोबत व्यतीत केले आहे. तसेच त्यांचे वडील श्रीकांतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुरु परंपरेनुसार प्राचीन विद्या आत्मसात केली. डॉ. पुरुषोत्तम यांच्या वडिलांनी संस्कृतमध्ये पीएचडी करताना वैदिक साहित्यात विशेषज्ञता प्राप्त केली होती. वडिलांकडून वेदाभ्यासाचे धडे घेत त्यांनी आयुर्वेद, योग ते तत्वज्ञान आणि वैदिक विज्ञान इ. विषयांचाही अभ्यास केला. समग्र दृष्टिकोन ठेऊन, निसर्गाच्या सानिध्यात राहत आरोग्य व निरोगी आयुष्य कसे जगायचे, याची प्राचीन शिकवणी त्यांनी घेतली.
त्यामुळे आपणही मनातील शंका दूर करून घ्या आणि आजच्या live सत्रात जरूर सहभागी व्हा. सायंकाळी ७ वाजता, लोकमत भक्ती या युट्युब चॅनेलवर!