शहरं
Join us  
Trending Stories
1
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
2
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
3
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
4
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
5
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
6
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
7
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
8
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
9
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
10
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
11
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
12
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
13
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
14
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
15
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
16
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
17
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
18
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
19
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
20
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 

दत्त गुरुंचे दर्शन लाभलेले प.पू.गुळवणी महाराज यांची आज पुण्यतिथी; जाणून घ्या त्यांचा चैतन्यमयी प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 8:00 AM

गुळवणी महाराज हटयोगी होते, त्यांनी दीक्षा देऊन अनेक शिष्यांना सन्मार्गी लावले आणि त्यांचा उद्धार केला, वाचूया त्यांचा जीवनप्रवास!

सामान्य घरात जन्माला आलेले बालक आपल्या कलेने, गुणांनी, गुरुकृपेनी आणि सदाचरणाने गुरुपदाला कसे पोहोचते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुळवणी महाराजांचे चरित्र. त्यांना लाभलेला संत सहवास, दत्त गुरुंचे दर्शन, आत्मज्ञानाचा लागलेला शोध आणि अधिकारी पुरुषांचा सहवास हे सारेच विलक्षण आहे. गुळवणी महाराज यांच्याकडे दीक्षा घेण्यासाठी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी येत असत. पंचांगकर्ते पं. धुंडिराजशास्त्री दाते हे गुळवणी महाराजांना खूप मानत अत. सर चुनीलाल मेहता हे प्रांताचे अर्थमंत्री होते. ते मुंबईहून पुण्याला गुळवणी महाराजांच्या दर्शनासाठी आपल्या पत्नीसह आले. पुढे ते दोघे गुळवणी महाराजांचे शिष्य होऊन त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. २५ जानेवारी रोजी तिथीने त्यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांच्या समग्र आयुष्याचा थोडक्यात आढावा. 

वामनराव गुळवणी यांचा जन्म कोल्हापूरजवळ कुडुत्री या गावी मार्गशीर्ष वद्य १३ रोजी गुरुवारी, शके १८०८, दिनांक १३ डिसेंबर १८८९ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प.पू. दत्तात्रय व मातेचे नाव उमादेवी होते. दत्तात्रय यांचे दोन विवाह झाले होते. वामनरव हे द्वितीय मातेचे चिरंजीव.

गुळवणी हे एक सदाचारसंपन्न, वैराग्यशील कुटुंब होते. वामनरावांना उपनयन संस्कारानंतर त्यांच्या वडिलबंधूंकडून धार्मिक आचाराचे शिक्षण मिळाले. त्यांनी संस्कृत ग्रंथाचे अध्ययन केले. बालपणापासून त्यांचा देवधर्माकडे ओढा होता. चित्रकलेचे त्यांनी शिक्षण घेतले होते. ते उत्तम चित्रकार होते. कोल्हापुरात त्यांनी फोटोग्राफीचे दुकान काढले होते. 

१९०७ साली श्री. टेंबे स्वामी महाराज गुरुदर्शनाला वाडीला आले. वामनरावांचे वडील बंधू त्या वेळी वाडीला होते. त्यांनी वामनरावांना टेंबे स्वामी महाराजांचा फोटो त्यात एक श्लोक गुंफून आणण्यास सांगितला. त्याप्रमाणे वामनराव तयारीने आले. वामनराव, टेंबे स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी वामनरावांना एक पेटी दिली. ती शेवटपर्यंत वामनरावांच्या हातात होती. त्या प्रसाद पेटीच्या प्रभावाने आपण श्री वासुदेव निवास बांधला. तेथे अमाप अन्नदान, द्रव्यदान करू शकलो अशी वामनरावांची श्रद्धा होती. 

१९०९ साली वामनराव मुंबईला येऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण कोठेच जमले नाही. नंतर ते गाणगापुरीला आले. त्यांनी गुरुचरित्राची सहा पारायणे केली. पुडे कुरुगुडी या गावी टेंबे स्वामी महाराज व वामनराव यांची भेट झाली. प्रथम दर्शनातच वामनरावांना गुरुप्रसाद मिळाला. ते सदासर्वकाळ गुरुसेवा करू लागले. गीता, विष्णू सहस्रनामाची संथा व आसन प्राणायाम व अजाण जपाची स्वामी महाराजांनी दीक्षा दिली. 

औदुंबर मुक्कामी त्यांनी श्रीमाला मंत्राचे पुनश्चरण केले. श्री क्षेत्र गरुडेश्वरी स्वामी महाराजांकडून ते ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे शिकले. श्री दत्तात्रेयाचे एकमुखी चित्र त्यांनी स्वामी महाराजांसाठी काढण्यास सुरुवात करताच वामनरावांना साक्षात दत्तात्रेयाचे दर्शन झाले. त्यांच्या चित्रकलेचे सार्थक झाले. 

वामनरावांनी १९१७ ते १९२६ पर्यंत बार्शी म्युनिसिपल शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी केली. १९२६ ते १९४२ पर्यंत नूतन मराठी विद्यालय पुणे येथे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या योगे चित्रकला शिक्षकाची नोकरी केली. आसेतू हिमाचल तीर्थयात्रा केल्या. 

नंतर बंगालमधील एक संन्यासी प.पू. श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज व वामनराव यांचा हुशंगाबादला असताना परिचय झाला. त्याच स्वामी महाराजांनी वामनराव यांना योगदीक्षा देऊन शक्तिपात करण्याचे तंत्र शिकवले. वामनरावांनी स्वामी महाराजांच्या समवेत हटयोगातील श्रेष्ठ दर्जाच्या क्रिया, प्राणायाम व इतर कष्टसाध्य क्रिया आत्मसात करून घेतल्या. त्यामुळे वामनरावांचा अधिकार फार मोठा झाला. स्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी अनेक शिष्योत्तमांना शक्तिपात करून सन्मार्गाला लावले. लोक वामनरावांना सद्गुरु गुळवणी महाराज म्हणून लागले. 

गुळवणी महाराजांना प्राप्त झालेल्या या अलौकिक विद्येने लोकांचीही कुंडलिनी जागृत करण्याची साधना प्राप्त झाली. श्री गुळवणी महाराजांनी १९२४ पासून ही दीक्षा देण्यास प्रारंभ केला. अखेरपर्यंत हा कार्यक्रम सुरू ठेवला. 

१९६५ साली गुळवणी महाराजांनी वासुदेव निवासाची स्थापना केली व आपले जीवन लोककल्याणासाठी आणि लोकांवर परोपकार करण्यासाठी घालवले.  सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे, सत्संग धरावा, संसारातील आपत्ती व अरिष्टांनी खचून न जाता श्रद्धेने व विश्वासाने परमेश्वराची करुणा भाकावी, समर्पण वृत्तीने शरणागत होऊन साधना करावी. असा सद्गुरु गुळवणी महाराजांचा उपदेश आहे. 

भक्तीतून योग आणि योगातून परमज्ञान प्राप्त होते. हे सारे शिक्षण देणारे गुळवणी महाराज उत्तरायण लागल्यानंतर भीष्माचार्यांप्रमाणे थांबून भौतिक देह सोडून ब्रह्मलीन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि कार्याला त्रिवार वंदन!!!