तरुणांचे मनोबल वाढावे आणि राष्ट्रकार्याला वेग यावा म्हणून पार्ल्यात 'सुंदरकांड' व्याख्यानाचे आयोजन! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:05 PM2024-01-02T14:05:02+5:302024-01-02T14:05:37+5:30

तरुणांना प्रबोधन व मार्गदर्शन मिळावे म्हणून हनुमंताच्या कार्यावर आधारित निरूपणाचा निःशुल्क कार्यक्रम आयोजित केला आहे, रसिकांनी लाभ घ्यावा हे आवाहन!

To increase the morale of the youth and speed up the national work, 'Sundarkand' lecture is organized in Vile Parle | तरुणांचे मनोबल वाढावे आणि राष्ट्रकार्याला वेग यावा म्हणून पार्ल्यात 'सुंदरकांड' व्याख्यानाचे आयोजन! 

तरुणांचे मनोबल वाढावे आणि राष्ट्रकार्याला वेग यावा म्हणून पार्ल्यात 'सुंदरकांड' व्याख्यानाचे आयोजन! 

२०२४ वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वांना वेध लागले आहेत ते अयोध्येत उभारलेल्या भव्य दिव्य राम मंदिराच्या उद्घाटनाचे. त्यानिमित्ताने ठिकठिकाणी अनेक धार्मिक, सामाजिक उप्रक्रम सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून विलेपार्ले येथे रामकार्याला हातभार लावणाऱ्या हनुमंताच्या कार्याचा गौरव करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याबद्दल समितीने पुढीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे : -

नवीन आंग्ल-वर्ष सुरू झाले आहे आणि आपल्यासाठी दक्षिणायनाचा शेवट जवळ आला आहे! पुढील पूर्ण वर्ष जबरदस्त धामधुमीत जाणारच आहे, २२ जानेवारीचा राम मंदिर सोहळा पाठोपाठ निवडणुका, निवडणुक निकालानंतरची उलथापालथ! ह्या सगळ्यासाठी पाहिजे प्रचंड उर्जा... आणि आपल्याकडे अशी एक देवता आहे, ज्या देवतेची अतिप्रचंड ताकद, मनोबल आणि भक्ती ह्याची जगात तोड नाही! आपले हनुमंत!  तरुणांसाठी खास, सुन्दरकांडातील हनुमंतांचा पराक्रम सांगण्यासाठी आपल्या पार्ल्यात येत आहेत - आदरणीय श्री. अजेय बुवा रामदासी. 

वर्षाची सुरवात दणदणीत होण्यासाठी अध्यात्मिक बूस्टर डोस घेण्यासाठी नक्की या...दिनांक ५,६ आणि ७ जानेवारी, २०२४ रोजी संध्याकाळी ५ ते ८.३० ह्या वेळात देशस्थ ऋग्वेदी संघ, हनुमान रोड, विले पार्ले पूर्व येथे!

प्रवेश निःशुल्क आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:

अर्णव तेलंग: +91 99209 33063
मृदुला बर्वे: +91-9167968204

Web Title: To increase the morale of the youth and speed up the national work, 'Sundarkand' lecture is organized in Vile Parle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.