पितरांना सद्गती मिळावी म्हणून करतात सोमवती अमावस्येचे व्रत; वाचा मुहूर्त, विधी आणि महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 10:52 AM2021-04-08T10:52:29+5:302021-04-08T10:53:53+5:30

या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात.

They perform Somvati Amavasya vows so that the fathers may attain enlightenment; Read Moments, Rituals and Significance! | पितरांना सद्गती मिळावी म्हणून करतात सोमवती अमावस्येचे व्रत; वाचा मुहूर्त, विधी आणि महत्त्व!

पितरांना सद्गती मिळावी म्हणून करतात सोमवती अमावस्येचे व्रत; वाचा मुहूर्त, विधी आणि महत्त्व!

googlenewsNext

हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे. अमावास्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. अमावास्येला चंद्र दर्शन होत नाही. तिलाच दर्श अमावस्या असेही म्हणतात. १२ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आहे. आगामी काळात सोमवती अमावस्या येणार नसल्यामुळे १२ तारखेच्या सोमवती अमावस्येचे महत्त्व विशेष वाढले आहे. 

सोमवती अमावस्येला शिव पार्वतीची पूजा :
सोमवार हा भगवान शंकराचा. परंतु शंकराची एकट्याची पूजा करण्याचा आपल्याकडे प्रघात नाही. शिव आणि शक्ती या दोहोंची एकत्रित पूजा केली जाते. सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचेदेखील पूजन केले जाते. 

सोमवती अमावस्येचे महत्त्व :
सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते. त्यांच्या नावे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृ पितृ सेवा केली असता दहा पटींनी जास्त पुण्य प्राप्त होते, असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृ दोष दिलेला असेल, त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. तसे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 

पूजेचा विधी: 
सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करून शिव शंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फुल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत माळ ओढावी. दान धर्म करावा आणि पितरांचे स्मरण करून यथाशक्ती अन्न दान करावे. 

पूजेचा शुभ मुहूर्त :
अमावस्या तिथि: १२ एप्रिल, सोमवार
सोमवती अमावस्येचा प्रारंभ: ११ एप्रिल, रविवार प्रात: ६ वाजून ३ मिनिटांपासून 
सोमवती अमावस्येचे चे समापन: १२ एप्रिल सोमवारी को सकाळी ८ वाजेपर्यंत

Web Title: They perform Somvati Amavasya vows so that the fathers may attain enlightenment; Read Moments, Rituals and Significance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.