शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

भाग्य बदलण्यासाठी 'या' दोन गोष्टी पुरेशा असतात; तुमच्याकडे त्या आहेत का? तपासून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:49 IST

आपल्याला नेहमी दुसऱ्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो आणि स्वतःच्या भाग्याबद्दल दुर्दैव; पण स्वतःचेही भाग्य चमकवायचे असेल तर दोन गोष्टी तुमच्याजवळ हव्याच!

एक शेठजी आपल्या सुंदर सुकुमार मुलीसाठी त्यांच्या तोडीचे श्रीमंत स्थळ शोधतात आणि त्यांच्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह लावून देतात. मात्र काही दिवसातच शेठजींचा जावई वाईट लोकांच्या संगतीत येतो आणि नशा व जुगारात पैसे उडवू लागतो. मुलीचे विवाह सौख्य हरवते. ती हतबल होते. जावई स्वतःच्याच हाताने आपल्या कुटुंबाला दारिद्रयाच्या गर्तेत ढकलतो. 

मुलीच्या आईला खूप वाईट वाटतं. एवढं चांगलं स्थळ शोधूनही मुलीच्या वाट्याला असं दुर्दैव का यावं? ती शेठजींना सांगते, तिची परिस्थिती सुधारावी म्हणून आपण तिला काही आर्थिक हातभार लावूया का? यावर शेठजी म्हणतात, प्रत्येकाची वेळ यावी लागते, ती आली की आपोआप मार्ग निघत जातात. तोवर इच्छा असूनही आपण  काहीच करू शकत नाही. 

तरी एकदा, जावई घरी आलेला असताना शेठजींना सांगून मुलीच्या आईने त्याला आर्थिक मदत करावयास भाग पाडले. थेट मदत केली तर जावयाचा अपमान होईल, तो मुलीवर राग काढेल. या काळजीने शेठजींनी आपल्या नोकरांना सांगून मोतीचूर लाडवांमध्ये सोन्याच्या मोहरा घालून मिठाईचा खोका जावयाला भेट दिला. तो घेऊन घरी जात असताना जावयाने विचार केला, मिठाई खाण्यापेक्षा ती विकली तर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न तरी सुटेल. या विचाराने तो हलवायाकडे जातो आणि ती ताजी मिठाई विकून मिळालेले पैसे विकून घरी जातो. 

बाहेरची कामे आवरून शेठजी घरी परतत असताना विचार करतात, आज मुलीला लाडू खाताना आनंद होईल. या आनंदात आपणही घरी मिठाई घेऊन जाऊया. असे म्हणत शेठजी त्याच हलवायाच्या दुकानात जातात, लाडू विकत घेतात. हलवाई तोच मिठाईचा खोका पुढे करतो आणि मोबदला घेतो. शेठजी मिठाईचा खोका घेऊन घरी येतात, तर पहिल्याच घासला लाडवांबरोबर सुवर्ण मोहरा दाताखाली आलेली पाहून आश्चर्यचकित होतात. त्यांची पत्नीही गोंधळून जाते. 

यावर शेठजी म्हणतात, 'बघितलंस? आपल्या मुलीला मदत करावी अशी आपली इच्छा होती. पण तसे असूनही ती पूर्ण होऊ शकली नाही. कारण मुलीच्या नशिबात अजून प्रारब्धाचा फेरा संपलेला नव्हता. म्हणून मदत पाठवूनही ती तिच्यापर्यंत पोहोचली नाही. एवढंच काय तर एवढी चांगली संधी हलवायाच्या हाती येऊनही हुकली! याचाच अर्थ 'वक्त से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिल सकता!' 

नशिबावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आपली वेळ आली की भाग्य उघडते आणि वेळ नसली की भाग्य साथ सोडते. मात्र यावर पूर्णपणे विसंबून न राहता ज्यो प्रयत्न करतो, कष्ट घेतो, संयम बाळगतो तो स्वतःचे भाग्य स्वतःच बदलतो आणि अशाच प्रयत्नवादी माणसाला देवही मदत करतो. यासाठी २ गोष्टी तुमच्याजवळ हव्या, 'सकारात्मकता आणि दृढ निश्चय! या दोन गोष्टी तुमच्याजवळ आहे का तपासून बघा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी