शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

Numerology: ‘या’ ३ तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळतो भरपूर पैसा, मान-सन्मान; शनी कृपेने मिळते अपार यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 07:30 IST

Numerology: या मूलांकाच्या व्यक्ती मेहनती, बुद्धिमान असतात. मान-सन्मान, पैसा भरपूर कमावतात, असे सांगितले जाते. तुमचा मूलांक कोणता? जाणून घ्या...

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. ज्योतिषशास्त्र हे असे शास्त्र आहे, ज्याच्या अनेकविध शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येतात. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. 

मराठी महिन्यानुसार, चातुर्मासातील एक महत्त्वाचा महिना श्रावण सुरू आहे. तर इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली आहे. ऑगस्ट हा ८ वा महिना आहे. अंकशास्त्रानुसार, मूलांक ८ चा स्वामी शनी देव आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. ज्या लोकांचा जन्म ८, १७ आणि २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाशी संबंधित लोक खूप मेहनती, बुद्धिमान आणि प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवतात. ते सहसा खूप शांत स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात काय आहे, याचा थांग लागणे खूपच कठीण मानले जाते. या मूलाकांवर शनी देवाची कृपा असते, असे सांगितले जाते. 

खूप मेहनत करतात आणि स्वबळावर मिळवतात यश 

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव गूढ असतो. हे लोक मेहनती असतात आणि स्वतःच्या हिंमतीवर यश मिळवतात. त्यांना समाजात खूप मान-सन्मान मिळतो. ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचे समर्थन करतात. कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच ते श्वास घेतात. याचा अर्थ ते त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात. तसेच हे लोक नशीबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र जीवनात यशस्वी होऊनही हे लोक साधे जीवन जगतात.

अपार संपत्तीचे स्वामी असतात

मूलांक ८ असलेल्या व्यक्तींना भरपूर पैसा मिळू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती सामान्यतः स्थिर असते. खर्च करण्याकडे त्यांचा अधिक कल नसतो. ते बचत योजना आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगला नफा कमावू शकतात. मूलांक ८ च्या व्यक्ती बहुतेक अभियंते किंवा इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित काम करतात. हे लोक चांगले उद्योगपती देखील होऊ शकतात. बिल्डिंग मटेरियल सप्लायर, लोखंड आणि तेलाशी संबंधित व्यवसाय त्यांना अधिक फायदा देतात. हे लोक पोलिस किंवा लष्करासारख्या सेवेतही काम करतात. यासोबतच हे लोक संशोधनाच्या क्षेत्रातही चांगले नाव कमावतात. सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.  

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष