शहरं
Join us  
Trending Stories
1
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
2
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
3
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
4
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
5
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
6
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
7
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
8
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
9
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
10
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
11
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
12
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
13
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
14
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
15
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
16
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
17
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
18
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
19
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
20
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?

Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ तारखांपैकी झालाय? अपार यश, मान-सन्मान; कमावतात भरपूर पैसा, असते गुरुकृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 07:07 IST

Numerology: साहसी आणि उत्तम नेतृत्व करणाऱ्या या मूलांकाच्या व्यक्तींना गुरुकृपेमुळे चांगले यश, प्रगती साध्य करता येते, असे सांगितले जाते.

Numerology: नवग्रहांचा गुरु मानला गेलेला बृहस्पति हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रातही गुरुला वरचे स्थान आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. ज्योतिषशास्त्राला प्राचीन काळापासून भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनेकविधा शाखांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीविषयी अंदाज बांधता येऊ शकतात. नक्षत्र, ग्रह-तारे यांचे चलन, परिभ्रमण यांच्या अभ्यासातून मानवी जीवनावरील प्रभाव पाहिला जातो. फक्त जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. यापैकी एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र.

या अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांक किंवा भाग्यांकावरून व्यक्तीचा स्वभाव, गुण-वैशिष्ट्ये, भविष्यकथन केले जाऊ शकते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म ३, १२, २१ किंवा ३० या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ३ आहे. गुरु हा मूलांक ३ चा स्वामी आहे. अलीकडेच गुरु आपल्या स्वराशीतून म्हणजेच मीन राशीतून मेष राशीत विराजमान झाला आहे. पुढील सुमारे वर्षभर गुरु मेष राशीत विराजमान असेल. अंकशास्त्रानुसार गुरु स्वामित्व असलेले या मूलांकांच्या व्यक्ती ऊर्जावान असतात. तसेच धैर्यवान आणि निर्भय असतात. प्रत्येक संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.

बुद्धिमान, प्रतिभावान आणि महत्त्वाकांक्षी

अंकशास्त्रानुसार, मूलांक ३ असलेल्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असतात. तसेच प्रतिभावान असतात. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतात. या व्यक्ती कोणत्याही कामाला विचार न करता हात लावत नाहीत. जे काही काम सुरू करतो ते पूर्ण करूनच थांबतात. त्यांचे परिश्रम आणि कोणत्याही कामाची आवड त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास मदत करते. त्यांच्या उच्च महत्त्वाकांक्षेमुळे ते नेहमीच प्रगती करतात.

व्यापार अन् करिअरमध्ये मिळते यश, होते चांगली प्रगती

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती व्यवसायातही खूप पुढे जातात. मूलांक ३ असलेले लोकं त्यांच्या कलात्मक विचार आणि ज्ञानाने त्यांच्या व्यवसायाला एक नवीन आयाम देतात. व्यापारातील समर्पण आणि मेहनतीमुळे त्यांना चांगले पैसे मिळतात. ज्ञान आणि विवेकबुद्धीच्या जोरावर या व्यक्ती नोकरीत उच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचतात. गुरुकृपेमुळे करिअरमध्ये अपार यश आणि प्रगती साध्य करू शकतात. 

साहसी आणि उत्तम नेतृत्व करणारे मानले जातात

मूलांक ३ असलेल्या व्यक्ती साहसी असतात. या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती खूप मोकळ्या मनाच्या आणि स्वभावाच्या असतात. त्यांना त्यांचे जीवन स्वातंत्र्याने जगणे आवडते. स्वभावाने या व्यक्ती शांतीप्रिय, कोमल मनाचे, मृदुभाषी आणि सत्यवादी असतात. मूलांक ३ असलेल्या व्यक्ती बुद्धिमान, धैर्यवान आणि निर्भय आहेत. कोणाचीही कामात अनावश्यक ढवळाढवळ त्यांना अजिबात आवडत नाही. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिष