शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अपरिमित नुकसान; स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांना भावपूर्ण निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 12:29 IST

डॉ. प्रभा अत्रे यांचे ९२ यांना देवाज्ञा झाल्याची बातमी आली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विश्वावर अवकळा पसरली; त्यांना शब्द सुमनांजली!

'जागू में सारी रैना बलमा' ही प्रभा ताईंनी गायलेली बंदिश तुम्ही ऐकलीय? शास्त्रीय संगीताची आवड नसली, तरीही एकदा ती जरूर ऐका. अवघ्या पाच मिनिटांत अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मूर्त स्वरूप दिसेल. तपश्चर्या कशाला म्हणतात हे त्यांच्या गायकीतून कळेल. त्यांचा यमन, मारुबिहाग, कलावतीही तेवढाच प्रिय, अवीट गोडी देणारा!

फार कमी लोक असतात, ज्यांना आपल्या आयुष्यात कोssहम? अर्थात मी कोण, कशासाठी जन्माला आलोय आणि मला काय करायचे आहे, याची कमी वयात जाणीव होते. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यादेखील अशाच दिग्गजांपैकी एक! वयाच्या आठव्या वर्षी त्यांना आईकडून गाण्याचा वारसा मिळाला. पं. सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्याकडून किराणा घराण्याची तालीम मिळाली आणि तेव्हापासून त्या अविरतपणे आपली गायनसेवा देत आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे प्रभाताईंना मिळालेले सन्मान, हा तर त्या पुरस्कारांचा गौरव! आयुष्यभर विपुल गायन, लेखन, प्रबोधन, प्रशिक्षण देऊन या गानतपस्विनीने आज जगाचा निरोप घेतला. 

शास्त्रीय संगीत क्षेत्राला एकामागोमाग एक हादरे बसत आहेत. ग्वाल्हेर घराण्याच्या रियाजसिद्ध गायिका मालिनी ताई राजूरकर, पखवाज तालश्री पंडित भवानी शंकर,रामपूर सहस्वान घराण्याची पताका त्रिखंडात गाजविणारे उस्ताद रशीद खान आणि आज  किराणा घराण्याच्या स्वयंभू प्रतिभासंपन्न संगीत साधिका गान गुरू डॉक्टर प्रभाताई अत्रे ..भारतीय संगीताला वेढून राहिलेली स्वरसरस्वती लुप्त झाली.शास्त्रीय संगीताकडे पाहण्या ऐकण्याची दृष्टी केवळ त्यांच्याशी साधलेल्या संवादातून,सहवासातून माझ्या सारख्या अनेकांना मिळाली. संवेदनशील कवयित्री, लेखिका, जगभर भारतीय संगीताच्या श्रवण मनन निदिध्यासाचे मार्गदर्शन  करणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या ज्येष्ठ गायिका प्रभा ताई, तुम्हाला अखेरचा दंडवत. 

त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळावी हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे.

टॅग्स :musicसंगीत