शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 17:58 IST

Tarot Card: दिलेल्या टॅरो कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता.

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१५ जून ते २१ जून===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

नंबर १:

काय घडू शकते?

हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, शक्ती आणि सामर्थ्य देणारा आहे. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी जे काही साधन लागणार आहे, ते तुमच्या पुढ्यात येणार आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील, इच्छाशक्ती भक्कम राहील. कोणतीही समस्या सोडवायला तुम्हाला योग्य मार्ग सुचतील. जरी तुम्ही एकटे असाल, तरी तुम्हाला सशक्त वाटेल!

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे संसाधनांचा योग्य उपयोग. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अतिवापर करू नका. बुद्धीने निर्णय घ्या, भावनांमध्ये अडकू नका. ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी लवचिक आणि चपळ रहा. "जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" हे लक्षात ठेवून स्वावलंबी व्हा!

नंबर २:

काय घडू शकते?

हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा आरामाचा असणार आहे. तुम्ही पूर्वी बरेच श्रम केले आहेत, आता दिवाळीत तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल. ही दिवाळी तुमच्यासाठी निवांतपणा घेऊन येत आहे, त्यामुळे "आनंदी आनंद गडे" असा अनुभव तुम्हाला येईल!

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही स्वार्थ सोडून इतरांचा देखील विचार करण्याची गरज आहे. हा वेळ स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा. दिवाळीत दिमाखात साजरी करा, पण दिखावेपणा करू नका!

नंबर ३:

काय घडू शकते?

हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. संयम आणि धैर्याचा कस लागेल. काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. पण संयमाचे फळ शेवटी गोड मिळेल याची खात्री ठेवा.

तुम्ही काय करावे?

या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. आर्थिक गुंतवणूक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.

सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष