साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२ ते ८ मार्च===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या समोर अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा कस लागेल. हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत. जे मिळायला हवे, त्यात काहीतरी कमी राहू शकते. तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. अगदी मनासारखे न होता, गरजेपुरते काम भागेल. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही धैर्य ठेवा, संयम ठेवा, मन शांत ठेवा. इतरांची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. भांडणात मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा. ध्यान करा, मेडिटेशन करा.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी सगळ्यांसोबत देवाणघेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे जाणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात. आजूबाजूला समन्वय आणि समानता साधली जाईल. एखादे बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. "एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ" प्रमाणे वागा!
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार आणि नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट संवादातून काहीतरी मार्ग निघेल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये, घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही बुद्धिमत्ता आणि वैचारिक कौशल्य वापरण्याची गरज आहे. भावनेपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी निर्णयापर्यंत पोचण्याची गरज आहे. एखादी नवीन सुरुवात करू शकता. तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुमचं मत परखडपणे मांडा, पण त्यात अरेरावी नको.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.