साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२९ डिसेंबर ते ४ जानेवारी===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी एकाच वेळी घेऊन येणार आहे. बऱ्याच कामांमध्ये लक्ष द्यावं लागू शकतं. त्यामुळे तुमची तारांबळ उडू शकते. तुम्हाला ओझं वाहून नेत असल्याप्रमाणे वाटू शकतं. एक प्रकारचं दडपण आणि ताण येऊ शकतो. पण हा शेवटचा टप्पा आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही करत असलेलं काम उत्साहाने पूर्ण करा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही अनेक गोष्टी स्वतःवर ओढवून घेऊ नका, त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मान, पाठ, डोकं आणि डोळे यांच्याकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला वाटत असेल तेव्हा मदत नक्की मागा. तुम्ही एकटे नाही, हे लक्षात ठेवा. जगात अजून मदत करणारी चांगली माणसं आहेत यावर विश्वास ठेवा!
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. एखादं काम पूर्णत्वास जाऊ शकते. तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. ज्या मार्गावर आहात तिथे खंबीरपणे पुढे जाऊ शकाल. अडथळे दूर होतील, त्यांना पार करण्याची शक्ती तुमच्याकडे असेल. एकूण तुमचे वर्चस्व राहील आणि तुम्ही अधिक सक्षम व्हाल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचा आवाज लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे. बुजरेपणा झटकून पुढे या. परिस्थितीशी दोन हात करा. आत्मविश्वास ठेवा फक्त त्याचा अतिरेक नको! गरज पडेल तसे पुढे होऊन नेतृत्व करा. बदल घडण्याची वाट बघू नका, तो स्वतः घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा! ताबा आपल्या हातात घ्या, दिशा तुम्ही ठरवा!
नंबर ३:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तुमच्या समोर अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा कस लागेल. तुम्हाला हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत. जे मिळायला हवे, त्यात काहीतरी कमी राहू शकते. तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. गरजेपुरते काम भागेल. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही धैर्य ठेवा, संयम ठेवा, मन शांत ठेवा. इतरांची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. कोणत्याही प्रसंगात मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा. ध्यान करा, मेडिटेशन करा.
संपर्क : ९५६१०९३७४०