शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: रखडलेली कामे मार्गी लागण्याचा काळ; टॅरो  कार्डनुसार वाचा साप्ताहिक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 11:24 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२३  ते २९ जून===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी दिलासादायक असणार आहे. तुमचे काम पूर्णत्वाकडे पोचण्याची चांगली शक्यता आहे. तुमच्या शिक्षकांचा, मोठ्या व्यक्तींचा आणि साथीदारांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. काहीतरी नवीन शिकाल आणि शिकवाल. "आधी लगीन कोंढाण्याचे" या प्रमाणे कर्तव्याला न चुकता काम केले तर समाधानकारक फळ मिळेल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या मार्गदर्शक व्यक्तींचा सल्ला अजिबात टाळू नका. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून तुमचे चांगले होणार आहे. नियमात बसेल असेच वागा आणि त्याप्रमाणे काम करा. जोखीम किंवा चौकटीबाहेरच्या गोष्टींना आत्ता हात घालू नका. आध्यात्मिक गुरुंची उपासना करा. प्रयत्नांना प्रार्थनेची शक्ती जोडा!

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी आनंदाचा आणि समाधानाचा असणार आहे. एखादा प्रमुख टप्पा गाठला जाईल. त्यामुळे तुम्हाला आतून उत्साह वाटेल. एखादा कार्यक्रम ठरेल. एखादा सण साजरा केल्यासारखा आनंद होईल. सगळ्यांची साथ मिळेल. एक चांगले निष्पन्न निघेल. केलेल्या कष्टाचं चीज होईल. पुढची वाट मोकळी होईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या परिश्रमाचे चांगले परिणाम अनुभवणार आहात. त्यासाठी तुम्ही थोडी सवड काढण्याची गरज आहे. तुम्हाला ज्यांनी आत्तापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहा. आत्ता पाया मजबूत करुन पुढचे नियोजन करण्याची तयारी सुरु करा. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असे वागा!

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचे बदल घेऊन येत आहे. जर आत्ता तुम्ही निराश असाल तर या आठवड्यात ही परिस्थिती नक्कीच सुधारणार आहे. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टी किंवा माणसं अनुकूल होतील. काही गोष्टींना गती मिळेल, योग्य दिशा मिळेल. अडकलेले काम सुटेल. नशिबाची चांगली साथ मिळेल.

या आठवड्यात तुम्ही प्रामाणिक कष्ट करण्याची गरज आहे. आत्ता तुम्ही आनंद उपभोगत असाल तर हीच वेळ आहे दुसऱ्याला मदत करण्याची. निसर्गचक्र लक्षात ठेवा. तुम्ही चांगल्या परिस्थितीत असाल तर त्याचा अभिमान न ठेवता सत्कर्म करा आणि कोणाला दुखवू नका. वेळ कधीही सांगून परीक्षा घेत नाही हे लक्षात ठेवा!

संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष