शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

Tarot Card: रक्षाबंधनाचा सण आणि एकूणच संपूर्ण आठवडा कसा जाणार हे टॅरो कार्ड सांगणार; निवडा एक कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 07:40 IST

Tarot Card: टॅरो कार्ड च्या माध्यमातून आपले मन ज्या कार्डाची निवड करते त्यातून भविष्य उलगडते, असेच साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर===============

नंबर 1:

हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं. त्याच गोष्टी नाविन्याने घडतील. त्याच व्यक्ती नव्याने भेटतील. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती पुन्हा नव्याने जवळ येतील. नवीन उमेद, नवा उत्साह वाटेल. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. पैसा किंवा भौतिक गोष्टी जरी मिळाल्या नाहीत तरी सुद्धा एक आनंद आणि समाधान वाटेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. मनामधील निराशा किंवा वाईट विचार कमी होतील. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.

या आठवड्यात तुम्हाला बुध्दी किंवा सुख सोयीच्या भौतिक वस्तू, यांमध्ये अडकून न राहता, भावनिक पातळीवर आनंद देणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत. एखादी कला आत्मसात करा, काही संबंध बिघडले असतील तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः कमीपणा घ्या. मान अपमान बाजूला ठेवा. इतरांना आनंद द्या, त्यांना काय हवं नको ते बघा. लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून आणि माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे. जुने छंद पुन्हा हाती घ्या. शुद्ध आणि मोकळ्या मनाने वागा.

नंबर 2:

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन संकल्पना, नवीन विचार, नवीन पर्याय, नवीन संवाद घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, किंवा जे करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. वाटेत आलेला अडथळा दूर करण्याचा मार्ग सापडेल. अनुत्तरित प्रश्न सुटतील. स्पष्ट आणि खऱ्या संवादातून काहीतरी मार्ग निघेल. समस्या कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. कामामध्ये किंवा घरामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण घडेल. आहात त्यापेक्षा अधिक सक्षम व्हाल.

या आठवड्यात तुम्ही बुद्धीने काम करण्याची गरज आहे. भावना किंवा भौतिक वस्तुंपेक्षा तुम्हाला सारासार विचार करून कुठल्यातरी निर्णयापर्यंत किंवा कुठल्या तरी पर्यायापर्यंत पोचण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी एक वेग ठेवणं गरजेचं आहे. वेळ वाया घालवू नका. लोकांशी तुमचं संभाषण अत्यंत स्पष्ट आणि खरं ठेवा. तुम्हाला एखादा विचार नाही पटला तर निसंकोचपणे सांगा, पण त्यात अरेरावी नको. परखडपणे तुमचं मत मांडा. कुठली नवीन सुरुवात करायची असेल तर करा, विशेष करून ऑनलाईन माध्यमात किंवा संभाषण क्षेत्रात.

नंबर 3:

हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. भौतिक, आर्थिक पातळीवर काही कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीमध्ये अनुकूल मान सन्मान मिळेल. इतर लोक तुमच्या मताला किंमत देतील. व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. केलेल्या कष्टाचं चीज होईल. एक प्रकारची स्थिरता येईल. आरोग्याच्या तक्रारी काही प्रमाणत कमी होतील. तुमच्या हातात सूत्र राहतील.

या आठवड्यात तुम्हाला तुमच्या संसाधनांचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. व्यवसायामध्ये एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. तुम्ही इतरांसाठी आधार बना, इतरांना त्यांच्या कामात मदत करा. व्यावहारिक वागा, भावनांमध्ये विचारांमध्ये अडकून राहू नका, तुमच्या फायद्याचा विचार करा. फक्त स्वार्थबुद्धीने चालू नका, आहे ते इतरांसोबत वाटा. गर्व करू नका.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषRaksha Bandhanरक्षाबंधन