शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: भविष्याचा काळ आहे स्वप्नपूर्तीचा; तुमचे कार्ड तुमचे भविष्य काय सांगते ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 07:00 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून आपल्याला साप्ताहिक भविष्य जाणून घेता येईल. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर===============

नंबर 1:

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन भौतिक आनंद, सुख सोयी अनुभवता येतील. तुम्ही जे करत आहात, किंवा जे करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये एक पाऊल पुढे वाढू शकता. अडकलेले काम सुटेल. कौटुंबिक सुख समृद्धी राहील. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल. घर, गाडी, नोकरी, व्यवसाय, जमिनीचे काम यासंदर्भात चांगली प्रगती होईल.

या आठवड्यात तुम्ही सावकाश आणि चिकाटीने काम करण्याची गरज आहे. भौतिक, आर्थिक, व्यावहारिक गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. त्यामध्ये नवीन सुरुवात करू शकता. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन योजना मांडा, सुरू करा. विनम्रपणे तुमचं कौशल्य दाखवा. नवीन काहीतरी शिकू शकता. कुठली नवीन सुरुवात करायची असेल तर करा, विशेष करून आर्थिक विषयात.

नंबर 2:

हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा कठीण असणार आहे. तुम्ही अशा परिस्थितीत अडकाल ज्यात तुम्हाला तुमच्या जागेवर पाय घट्ट रोवून उभं रहावं लागेल. काही लोक, काही स्पर्धक तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकाल. तुम्ही या काहीशा अवघड परिस्थितीवर तुमच्या जिद्दीने नक्कीच यश मिळवू शकता.

या आठवड्यात तुम्ही येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची, तुमचं सर्वोत्तम देण्याची गरज आहे. काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाका. धीट व्हा, घाबरण्याची गरज नाही. स्वतःच स्वतःसाठी उभे रहा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. हा विश्वास ठेवा की तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ताकद आहे ज्याने तुम्हाला ही परिस्थिती जिंकता येईल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा.

नंबर 3:

हा सप्ताह तुमच्यासाठी देवाण घेवाण करणारा असणार आहे. इतरांच्या मदतीने तुम्ही पुढे वाढू शकणार आहात. भौतिक किंवा आर्थिक पातळीवर लाभ होऊ शकतात. अडकलेल्या कामात काही प्रमाणत पुढे जाऊ शकता. आहे ती परिस्थिती सुधारेल, एक प्रकारची स्थिरता वाटेल. अडकलेले पैसे सुटू शकतात, चांगले आर्थिक व्यवहार होऊ शकतात. एखादं बक्षीस किंवा आवडीची वस्तू भेट मिळू शकते.

या आठवड्यात तुम्ही इतरांना मदत करून आणि इतरांच्या मदतीने चालण्याची गरज आहे. अडलेल्या व्यक्तीला केलेली मदत तुम्हाला उपयोगी पडेल. इतरांशी वागताना बोलताना पक्षपातीपणा न करता काम करा. तुमच्याकडे असलेल्या संपन्नतेचा जराही गर्व करू नका. पाय जमिनीवर ठेवा. दिखावेपणा करू नका. काहीतरी विकत घेताना तोलून मापून विचार करून मग घ्या. अनुभव आणि विवेकाने वागा

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष