शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Tarot Card: जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल सेल्फ मोटिव्हेशनची गरज; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:59 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घ्या. 

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२९ जून ते ५ जुलै===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============

नंबर १: (राशी- वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एका कलाटणीचा असणार आहे. महत्त्वाचे बदल घडतील. हे बदल तुमच्या मनाप्रमाणे नसतील आणि तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. अपेक्षित ध्येय गाठण्यात अजून वेळ आणि कष्ट लागतील. पण असं असूनही घाबरु नका, हे बदल सुधारणा करण्यासाठी गरजेचे आहेत. "बदल हा निसर्गाचा नियम आहे" हे विसरू नका!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतःचा अहंकार, गर्व आणि मोठेपणा बाजूला ठेवून वागण्याची गरज आहे. आलेल्या परिस्थितीशी झगडायला जाऊ नका, शांतपणे स्वीकार करा. मागे झालेल्या वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न करा. अंधार झाल्यानंतरच नवा सूर्योदय होतो आणि अंधारात आपल्याला सोबत करायला एखादी तरी चांदणी नेहमी असते हे लक्षात ठेवा!

नंबर २: (राशी - मिथुन/कन्या/धनू/मीन)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी खोळंबलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. मनातून उत्साह आणि ऊर्जा कमी राहील. अपेक्षित गती किंवा परिणाम मिळणार नाहीत. सगळं असूनही काहीतरी नसल्याची भावना निर्माण होईल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.

नंबर ३: (राशी- मेष/कर्क/तूळ/मकर)

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी भौतिक संपन्नता आणि आर्थिक सक्षमता घेऊन येत आहे. आर्थिक कामे अडकलेली असतील तर ती आता मार्गी लागतील. आहात त्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत पोहोचाल. एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरी व्यवसायामध्ये चांगले यश संभवते. आरोग्यात सुधारणा होईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जवळ असलेल्या वस्तूंचा अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करायचा आहे. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अती वापर करू नका. एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊन मग आर्थिक निर्णय घ्या. एखाद्या अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. इतरांसाठी आधार बना. स्वार्थापलीकडे जाऊन लोकसेवा करा!

संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष