साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३ ते ९ ऑगस्ट===============सुमेध रानडे,टॅरो कार्ड रीडर, पुणे===============
नंबर १: (राशी मिथुन/कन्या/धनू/मीन)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. पुष्कळ घडामोडी पटापट घडण्याचा हा काळ असणार आहे. काही लोकांबद्दल तुमचे मत बदलेल. तुमच्या विचारसरणीला धक्का लागू शकतो. विभक्त होणे किंवा फूट पडणे किंवा मतभेद होऊन वाद होणे अशी परिस्थीती निर्माण होऊ शकते पण तुमचा संयम आणि धैर्य तुम्हाला यातून तारून नेईल!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात कशीही परिस्थीती आली तरी खचून न जाता, तिला धीराने सामोरे जायचे आहे. लहानसहान भांडणे विकोपाला नेऊ नका, संयम आणि शांतता ठेवा. काही निरुपयोगी गोष्टी सोडून द्या, कचरा टाकून द्या. बदल हाच विश्वाचा नियम आहे आणि यातून काहीतरी चांगलेच होईल हा विश्वास ठेवा आणि त्या बदलत्या गोष्टींत सहभागी व्हा.
नंबर २: (राशी मेष/कर्क/तूळ/मकर)
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी डगमग डोलणारा आहे. कुठल्यातरी दोन किंवा अधिक गोष्टींमुळे तुम्ही तारेवरची कसरत करणार आहात. लक्ष एकाग्र न राहता विचलित जास्त होण्याची शक्यता आहे. हवे तसे ध्येय साध्य करायला अवघड आहे पण तरीही तुम्ही सांभाळत असलेल्या सर्व गोष्टीत तुम्ही पुढे जाणार आहात आणि हेच महत्त्वाचे आहे!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही कटाक्षाने बघा की आपण दोन दगडांवर पाय ठेवत असताना आपला तोल जात तर नाही ना. आर्थिक निर्णय पुढे ढकला. सगळीकडे उत्तुंग यशाची अपेक्षा ठेवू नका. पण तुम्ही मागच्या आठवड्या पेक्षा निश्चितपणे प्रगत होत आहात हे ध्यानात ठेवा. या सगळ्याचे दडपण न घेता यालाच जीवन ऐसे नाव समजून हा सप्ताह हलकेपणाने घालवा.
नंबर ३: (राशी वृषभ/सिंह/वृश्चिक/कुंभ)
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आहे. तुम्ही एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचण्याची शक्यता आहे. मागे केलेल्या नियोजनाला आणि कष्टाला चांगले यश मिळेल. पण मार्गावर पुढे जाण्यासाठी कुठल्यातरी गोष्टीची वाट बघावी लागेल. लोकांचं सहकार्य मिळेल. यात्रा किंवा प्रवास संभवतात.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही धैर्य आणि संयम ठेवण्याची गरज आहे. आहात त्या मार्गावर पुढे जाताना, विचारमंथन करा, इतरांचे मत जाणून घ्या. कामाचा विस्तार कसा करता येईल हा विचार करा. कोणत्याही परिस्थितीचा सगळ्या बाजूने विचार करा. तुम्ही आज जिथे पोचला आहात त्यात इतरांचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवा.
संपर्क : ९५६१०९३७४०श्रीस्वामी समर्थ.