शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 11:20 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी एक कार्ड निवडून तुम्ही तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ शकता. 

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२२ ते २८ सप्टेंबर===============

नंबर १:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या बुध्दीने काम करण्याचे प्रसंग घेऊन येत आहे. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये नवीन संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल. सक्षमतेने पुढे वाढाल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला तुमचे बोलणे स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" हे सिद्ध करुन दाखवा.

नंबर २:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम आणि शंका निर्माण करणारा ठरु शकतो. तुमचा स्वतः वरचा विश्वास कमी होऊ शकतो. इतरांनी तुमच्या डोक्यात काहीतरी घातले तर तुम्ही पूर्णपणे त्यांच्या प्रभावाखाली राहाल अशी शक्यता दिसते आहे. पण स्वतःला मजबूत ठेवले, मन भक्कम ठेवले तर हा सप्ताह तुमच्यातील कलेला, सृजशीलतेला वाव देणारा ठरेल!

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. मनाप्रमाणे वागता वागता तुम्ही वाहवत तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. इतरांचे बोलणे किती ऐकायचे हे तुम्ही ठरवा. ध्यान, मेडीटेशन, प्रार्थना करा. पटकन कोणावर विश्वास ठेवू नका. "मन चंगा तो कठोती में गंगा" या प्रमाणे तुम्ही मन आनंदी ठेवले तर हा काळ आनंदी!

नंबर ३:

काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. पण तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. तरीही तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या कुठल्यातरी भौतिक, आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल.

तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे. भरपूर कष्ट करा. वैयक्तिक गोष्टींत खूप वेळ अडकू नका. एखाद्या कामात कौशल्य मिळवा. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. स्वावलंबी व्हा. "एकला चलो रे" या गीतातील शब्द तुमच्या ध्यानात ठेवा.

संपर्क : ९५६१०९३७४०

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष