शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Tarot Card: येत्या आठवड्यात काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर आधी एक कार्ड निवडून मनाचा कौल घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 07:00 IST

Tarot Card: टॅरो कार्डनुसार तीनपैकी जे कार्ड निवडाल ते तुमचे साप्ताहिक भविष्य दर्शवते, हे मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल!

>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे

साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२९ ऑक्टोबर ते ४नोव्हेंबर===============

नंबर १:

हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. काही बाबतीत तुमची परीक्षा बघितली जाऊ शकते. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीकडून विश्वासघात किंवा एखाद्या व्यक्तीचं स्वार्थी वागणं होऊ शकतं. काही कामे रखडली जाऊ शकतात. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण काळजी करू नका, हे सगळं सहन केल्यावर पुढे चांगले बदल घडतील. 

या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका, आत्मसन्मान जपा. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. एवढासा सुद्धा नियम मोडू नका. आखलेल्या चौकटीतंच वागा. जोखीम उचलू नका. आत्ता अवघड वाटत असलं तरी आहे ते काम धीराने करत रहा. काही प्रमाणात आहे त्या भौतिक वस्तूंचा उपभोग घ्या. कोणत्याही वरवर चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.

नंबर २:

हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीच्या प्राधान्याचा असणार आहे. अशा घटना घडतील ज्यात तुम्हाला तुमच्या मनापेक्षा बुद्धीचा वापर करावा लागेल. बुद्धीचातुर्य दाखवावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. वरिष्ठ लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावं लागेल. काही प्रमाणात वाद संभवतात. कामामध्ये पाऊल पुढे टाकाल.

या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. मुळमुळीत उत्तर न देता, जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. अगदी सचोटीने वागा, खरे बोला. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. पक्षपात करू नका, भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या.

नंबर ३:

हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. तुमच्या आतली जिद्द, धाडस, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती, या सगळ्यांचा उपयोग या आठवड्यात होणार आहे. खूप दिवसांपासून पासून तुम्हाला हवं असलेलं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे, किंवा त्याबाबतीत सकारात्मक घटना घडतील. एखादा लहान आनंदी कार्यक्रम साजरा होईल. इतरांकडून मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे. लोकांना तुमचा सहवास आवडेल. त्यांच्याकडून सहकार्य मिळेल.

या आठवड्यात तुम्हाला तुमचं मन आणि विचार उत्साहयुक्त ठेवण्याची गरज आहे. काहीही झालं तरी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. लढण्याची वृत्ती ठेवा पण कोणाशी विनाकारण भांडू नका. वाद टाळा आणि एक मोठा सर्वांगीण विचार करा. स्पर्धा जिंकण्यापेक्षा काम असं करा की तुम्ही इतरांचं मन जिंकाल. आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि खेळाडू वृत्ती ठेवा. सगळयांना घेऊन पुढे चाला. चांगलं नेतृत्व करा.

श्रीस्वामी समर्थ.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष